Hanuman Sena News

नवरदेवाला लग्नात तलवार घेऊन नाचने भोवले, गुन्हा दाखल...





संग्रामपूर : शनिवारी रात्री लग्नाच्या वरातीत टूनकी येथे नवरदेवाला हातात तलवार घेऊन डीजे वाद्याच्या गाण्यावर ताल धरणे चांगलेच भाेवले. रविवारी सोनाळा पोलीस ठाण्यात नवरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला.संग्रामपूर तालुक्यातील टूनकी येथे शनिवारी रात्री नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सार्वजनिक ठिकाणी सचिन सूरेश कोष्टी हा नवरदेव हातात तलवार घेऊन डिजे तालावर नाचत असतांना दोन गटात वाद निर्माण झाला. यावेळी वरातीवर दगडफेक करण्यात आल्याने गावात तणाव निर्माण झाला. या नवरदेवाने तलवार हवेत फिरवून कायद्याचे उल्लंघन केले आहे.याप्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यातील विनोद शिंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन सूरेश कोष्टी विरुद्ध कलम ४,२५ भाहका सह कलम १३५ मपोका नुसार गून्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनाळा पोलिस करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم