खामगाव : लोकसभा निवडणुकीदरम्यान व्हॉट्सअॅपच्या ग्रुप अॅडमिन्सवर विविध निर्बंधांची गदा आली आहे. व्हॉट्सअॅपवरील एखाद्या आक्षेपार्ह संदेशामुळे निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अॅडमिनला जबाबदार धरले जाणार आहे. त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.प्रशासनाकडून निवडणुकीसंदर्भातील योग्य-अयोग्य बाबींबाबत सतत जनजागृती केली जात आहे. काही सक्त सूचनाही दिल्या जात आहेत.जाणीवपूर्वक खोटी, बनावट माहिती, व्हिडीओ, फोटो, मजकूर सोशल मीडियाद्वारे पसरविणे, जनतेमध्ये संभ्रमाचे अॅडमिनला या बाबींचे पालन बंधनकारक निवडणूक काळात खरी माहिती प्रसारित करा. खोट्या बातम्यांची तक्रार करा.कोणत्याही प्रकारची वांशिक, धार्मिक किंवा जातीविषयक तेढ निर्माण करणारी माहिती व्हॉट्सअॅपवरून शेअर होता कामा नये. माहिती किंवा बातमीबाबत पडताळणी तथा खात्री न करता वादग्रस्त मजकूर शेअर करू नये.कोणाच्याही खासगी हक्कांची पायमल्ली करीत त्यांच्या परवानगीशिवाय फोटो आणि व्हिडीओ शेअर करू नये.पाल्यांच्या मोबाइलवरील हरकतींवर लक्ष ठेवा फक्त निवडणुकीच्या काळातच नव्हे, तर कायमस्वरूपी पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या मोबाइलवरील हरकतींवर नियमित लक्ष ठेवावे. मोबाइलमध्ये पोस्ट, फोटो आदी लपविण्यासाठी (हाइड करण्यासाठी) काही खास क्लृप्त्या असतात. त्यांची व सर्व पासवर्ड्सची माहिती घेऊन पाल्यांचे मोबाइल चेक करून आपला पाल्य व एकूणच कुटुंबाला सर्वार्थाने सुरक्षित ठेवणे गरजेचे असल्याचा सल्ला पोलिस प्रशासनाने दिला आहे.वातावरण निर्माण करणे, कायदा व्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणे, धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणे आदी कृत्य रोखण्यासाठी व त्यावर कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करून त्यावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टची दखल घेऊन संबंधितांतर कारवाई करण्यात येईल.
व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनवर निर्बंधांची गदा आक्षेपार्ह संदेशांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदार...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق