Hanuman Sena News

विघ्नहर्ता लेझीम पथक व शिवसेना महिला आघाडी नांदुरा शहर यांच्या संयुक्त विद्यमानातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण आदरांजली...



                                                                        नांदुरा: १४ एप्रिल म्हणजेच जगातील सर्वात मोठी व लोककल्याणकारी राज्यघटना लिहिणारे संपूर्ण जगभरामधे आपल्या अतुलनीय कार्याचा ठसा उमटविणारे भारतरत्न डॉ. भीमराव आबेडकर यांची जयंती. या थोर महात्म्याची जयंती"१४  एप्रिल" डॉ.भीमराव आबेडकरां च्या 133 व्या जयंतीचे औचित्त साधुन विघ्नहर्ता महिला मंडळ संचालीत विघ्नहर्ता लेझीम पथक व शिवसेना महिला आघाडी नांदुरा शहर यांच्या संयुक्त विद्यमानातून भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लेझीम व ढोलताशा सरावाचे ठिकाण "हरसिद्धी लॉन" येथे आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात सौ.प्रज्ञाताई यांनी  डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी केलेल्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती देऊन त्यांनी दिलेली शिकवण व मार्ग हे डोक्यात ठेऊन जिवन जगावे असा मोलाचा संदेश दिला. त्यानंतर बाबासाहेबांची सामूहिक गिते गायण्यात आली. सदर कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख महिला आघाडी सौ सारिता ताई बावस्कार,उपशहर प्रमुख महिला आघाडी प्रज्ञाताई तांदळे, ढोल ताशा पथक व लेझीम पथक चे सर्व वादक व सदस्य हजर होते. शेवटी ढोल ताशा पथक व लेझीम पथक चे प्रशिक्षण हे विनामूल्य असुन जास्तीत जास्त महिला व तरुणीनी या पथकात सहभाग नोंदवा असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा सौ सरिताताई बावस्कार यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم