Hanuman Sena News

भाजपा जैन प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मलकापूरात महिला बचत गट स्थापन...



मलकापूर: भाजपा जैन प्रकोष्ट प्रदेश प्रमुख संदीपजी भंडारी यांच्या संकल्पनेतून सकल जैन महिला भगिनींचा बचत गट निर्माण करने महाराष्ट्रातील समस्त सकल जैन भगिनींना महिला बचत गट या संकल्पनेमुळे महिलांना आज आत्मसन्मान  मिळाला आहे. चूल आणि मूल  इतकंच भावविश्वास असणाऱ्या, शहर व ग्रामीण विभागातील महिला उंबराठ्याच्या बाहेर पडल्या. पाहिजे महिला बचतगटाच्या  माध्यमातून केलेल्या उद्योगामुळे त्या बाह्ययजगाच्या संपर्कात आल्या.पाहिजे महिला बचत गट ही संकल्पना मुळात बांगलादेशात महेमद युनीस यांनी राबविली आणि त्या संकल्पनेसाठी नोबेल पारितोषिक ही प्राप्त झाले.आज भारतामध्ये 45 लाखाहुन अधिक बचत गट आहेत आणि साडे चार लाखाहून अधिक बचत गट केवळ आपल्या महाराष्ट्रात आहे. बचत गटाच्या या चळवळीमुळे महिला सक्षम झाल्या आहेत व आत्मनिर्भर  झाल्या आहेत.आपल्या प्रत्येक गावात, जिल्यात, तालुक्यात आपल्या समाजाच्या समविचारी महिलासोबत कमीतकमी पाच व जास्तीत जास्त दहा बचत गट काढूया आपल्या प्रत्येक बचत गटाला कसा फायदा होईल ते पाहुया राज्यभरात पाचशे जैन महिला बचत गट स्थापन करण्यात येत आहे.त्यानुसार यापल्या मलकापूर शहरात नवकार जैन महिला बचत गट स्थापन करण्यात आला महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्याचे आहे या उपक्रमासाठी आज दिनांक 10/4/2024 रोजी दुपारी 1.30 वाजता नगार खाना येथे सकल जैन समाज महिलांची सभा आयोजीत करण्यात आली होती त्या सभेला संबोधित करण्यासाठी सौ. मिता जैन (विदर्भ विभाग उपप्रमुख जैन प्रकोष्ट महिला बचत गट महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्षा भाजपा चिखली यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पाहुणे म्हणुन सौ. मिनाताई संचेती ,सौ.सोनालीताई चवरे, भाजपा तालुकाध्यक्ष सौ. अश्विनीताई पाटील सौ. भारतीताई जैन सौ.मेघाताई सैतवाल उपस्थित होत्या. निताताई जैन यांनी बचत गटाची माहिती दिली बचत गटाचे महिलांसाठी व समाजासाठी असणारे फायदे सांगितले.मलकापुर ग्रामीण व शहरी भागात बचत गटाचे स्थापनेसाठी  मेघाताई सैतवाल यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी सकल जैन समाज व महिला भगिनी उपस्थित होत्या.

Post a Comment

أحدث أقدم