नांदुरा: भारत देश ही संतांची भूमी आहे, साक्षात परमेश्वराने येथे जन्म घेतला आहे. संपूर्ण जग एक कुटुंब आहे, विश्वची माझे घर असा संदेश संत देऊन गेलेत, तसेच जगाचा उद्धार करण्यासाठी ब्रह्मांडनायक श्री गजानन माऊली शेगाव येथे प्रगट झाले. जगभरातून भक्त या माऊलीच्या दर्शनासाठी येत असतात. या गजानन माऊलीची छत्रछाया आपल्या सर्व भक्तांवर नित्य असतेच. गजाननाच्या लीला आजही भक्तांना अनुभवायला मिळतात.
आज रविवार दि ०३/०३/२०२४ म्हणजेच गजानन महाराजांचा प्रगट दिन विघ्नहर्ता महिला मंडळ संचलित ढोल ताशा पथकाकडुन सर्वेश्वरी दिदी शिवालय आश्रम येथील श्री. संत गजानन महाराज मंदिर येथे साजरा करण्यात आला. साध्वी सर्वेश्वरी दिदी यांच्या गोड वानीसोबत सर्वांनी श्री गजानन महाराज बावन्नी, आरती व नामपाठ केला. सदर कार्यक्रमध्ये विघ्नहर्ता मंडळाकडून साध्वी सर्वेश्वरीदिदी, आश्रम नांदुरा यांच्या हस्ते उपस्थित सर्वांना श्रीमद भागवतगीता भेट म्हणून देण्यात आल्या. कु. हिंदवीसोबत सर्वांनी अध्याय पहिला मधील श्लोकाचे पठण केले. सर्वांनी श्री. संत गजानन महाराजांचा आशिर्वाद घेतला. यासोबतच सर्व मुलींनी पथकामध्ये एकजूट राहण्याचा व अधिक शिस्तप्रिय राहण्याचा संकल्प केला. संपूर्ण वातावरण अतिशय भक्तिमय प्रफुल्लित झाले होते. सदर प्रकट दिन सोहळ्या साठी पथकाच्या अध्यक्षा सौ. सरिताताई बावस्कार, कांचन काटे, गौरी बाठे, वैष्णवी लोखंडे, दुर्गा लाहुडकार, खुशी पारधी, अंजली क्षीरसागर, हिंदवी बावस्कार,ओम चिमकर, सुमित शेगोकार, प्रकाश बावस्कार,ऋषिकेश कापडे व पथकातील इतर वादक उपस्थित होते.
إرسال تعليق