मलकापूर: नगर सेवा समिती द्वारा संचालीत
लीलाधर भोजराज चांडक विद्यालयात रथसप्तमी निमित्त क्रिडा भारती,विद्याभारती तथा चांडक विद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने सूर्यनमस्कार महायज्ञाचे आयोजन दि. १६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा मलकापूर नगरात सूर्यनमस्कार महायज्ञाचे आयोजन केले गेले. या महायज्ञात विद्यालयातील 1350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. जयंत राजूरकर तर संचालन शारीरिक शिक्षक विक्रांत नवले सर यांनी व मार्गदर्शन श्री मिलींद काळे जिल्हा बौद्धीक प्रमुख तथा सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख यांनी केले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले,सूर्यनमस्कार ही सूर्य-उपासनाच आहे,हिच्यामुळे सर्वांगसुंदर व्यायाम होतोच पण आत्मिक, मानसिक, व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते. हा व्यायम अल्पमोली आणि बहुगुणीआहे असे म्हणतात. रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवसआहे. संपूर्ण जगात हा दिवस जागतिक सूर्यनमस्कार दिन म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण भारत भर विभिन्न प्रांतात हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.त्याच प्रमाणे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना दररोज पाच सूर्यनमस्कार घालण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रिडा भारतीचे जिल्हा संघटन मंत्री श्री गणेश तायडे सर, विद्याभारतीचे श्री जयपालजी घोती सर यांनी परिश्रम घेतले.
إرسال تعليق