Hanuman Sena News

ली.भो.चांडक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री सहदेव अवसरमोल यांचा सेवनिवृत्ती स्मारंभ संपन्न...

 मलकापूर: नगर सेवा समिती द्वारा संचालीत ली. भो. चांडक विद्यालयात दि 28 फेब्रुवारी रोजी जेष्ठ शिक्षक श्री सहदेव अवसरमोल सरांचा सेवा निवृत्ती समारंभ संपन्न झाला.शासकिय विहित नियमानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवा निवृत्ती ही अटळ असते परंतु सेवेत असतांना  केलेल्या कार्यामुळे सेवानिवृत्ती वेळी अशा कर्मचाऱ्याला निरोप देण्याची परंपरा आहे. आज असाच भावनिक कार्यक्रम चांडक विद्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह तथा मा.नगर संघचालक दामोदरजी लखाणी तर प्रमुख उपस्थिती मध्ये मा. माधवरावजी गावंडे, मा. सुगनचंदजी भंसाली, संजयजी चांडक व प्राचार्य डॉ.जयंतजी राजूरकर व सत्कारमूर्ती सहदेव अवसरमोल सर होते. या प्रसंगी श्री नितीन चव्हाण व आशिष अवसरमोल सर यांनी सहदेव अवसरमोल सरांच्या शालेय कारकिर्दीवर प्रकाश टाकला.त्याच प्रमाणे शाळेचे प्राचार्य डॉ. राजूरकर यांनी श्री अवसरमोल सरांनी शाळेसाठी केलेल्या कार्याबद्दल गौरव केला.संस्था, शाळा व आदर्श शिक्षक सोसायटी यांचे वतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री अवसरमोल म्हणाले, मी सिंधू नगर संघ शाखेचा स्वयंसेवक म्हणून प्रवास सुरू केला , त्यावेळी तत्कालीन संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास टाकून सेवेची संधी दिली,त्या विश्वासास पूर्ण उतरण्याचा मी आज पर्यंत सदैव प्रयत्न केला,अध्यक्षीय समारोप श्री दामोदरजी लाखाणी यांनी केला, ते म्हणाले,शासकिय नियमाप्रमाणे जरी आपण सेवानिवृत्त होत असला तरी कार्यकर्ता म्हणून आपण आगामी प. पु. डॉ. हेडगेवरांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये सक्रिय राहून कार्य कराण्याचे केले.कार्यक्रमाचे संचालन धर्मेंद्र त्रिवेदी यांनी केले.कार्यक्रमांची सांगता पसायदानाने झाली.

Post a Comment

أحدث أقدم