पुणे :राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावरून सुप्रिया सुळे यांनी नवऱ्याचा दाखला देत अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी उत्तर देत इशारा दिला आहे. माझ्या नवऱ्याने भाषणे केलेली तुम्हाला चालतील का? संसदेमध्ये नवरा जाणार की मी जाणार? नवऱ्याला संसदेच्या परिसरात परवानगी नसते. कॅन्टिनमध्ये बसावे लागते. तुम्हाला कसा खासदार पाहिजे, अशी विचारणा करत सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवार यांच्यावर टीका केली होती. यावरून आता सुनिल तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.सुप्रिया सुळेंनी भाषा सुधारावी अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल सदानंद सुळे यांच्याबद्दल आम्हाला आदर होता,आहे आणि उद्याही असेल. पण, महिला खासदारांचे पती संसदेच्या प्रेक्षक गॅलरीत पर्स वागवत फिरतात असे चित्र अद्यापतरी पाहिले नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या संसदेतील भवितव्याबाबत सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य हे असंस्कृत आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारात बसणारे नाही. सुनेत्रा पवार या उत्तम वक्त्या आहेतच. शिवाय त्यांचे तिन्ही भाषेवर प्रभुत्व आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून लोकोपयोगी काम त्यांनी उभारलेले आहे. त्यामुळे सुनेत्राताई पवार यांच्या संसदेतील भवितव्याबाबत सुप्रिया सुळे यांनी नैराश्य असले तरी असे वक्तव्य करणे थांबवावे. जर यापुढे अशीच वक्तव्य केली तर मात्र त्याला जशासतसे उत्तर दिले जाईल, असा इशारा सुनिल तटकरे यांनी दिला""दरम्यान, अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले योगदान महाराष्ट्राला ठाऊक आहे. १९९९ पासून अजित पवार वगळता राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती काय असती हे नव्याने सांगायला नको. अजित पवार यांच्या भाषण आणि प्रचारामुळे आजपर्यंत राष्ट्रवादी अनेक आमदार, खासदार विजयी झालेले आहेत. अजित पवार यांची सभा व्हावी हे राष्ट्रवादीच्या प्रत्येक उमेदवाराचे ध्येय असते. त्यामुळे अजित पवार हे स्वतः""उमेदवार असल्याच्या भावनेतून राष्ट्रवादीच्या प्रत्येक उमेदवाराचा प्रचार करतात अशीच भावना बारामतीकरांसमोर आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात केली. यात गैर काहीच नाही. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र सुनेत्रा पवार यांच्या क्षमतेबाबत संशय व्यक्त करत संकुचितपणाचे दर्शन घडवले आहे, असा टोला सुनिल तटकरेंनी लगावला.
“सुप्रिया सुळेंनी भाषा सुधारावी अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल”; सुनिल तटकरेंचा पलटवार...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق