Hanuman Sena News

पाच लाखांच्या खंडणीचे प्रकरण भोवले; पीएसआय तडकाफडकी निलबंन...




गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या वडिलांकडून पाच लाखांची खंडणी उकळल्याचे प्रकरण देहूरोडच्या पोलिस उपनिरीक्षकाला भोवले आहे. या उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलबंन करण्यात आले.सोहम धोत्रे असे निलंबित केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. उपनिरीक्षक धोत्रे हे देहूरोड पोलिस ठाण्याच्या तपास पथकात कार्यरत होते. किवळे येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्या वडिलांकडून पाच लाखांची खंडणी उकळण्यात आली. या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात पोलिस नाईक हेमंत चंद्रकांत गायकवाड आणि पोलिस शिपाई सचिन श्रीमंत शेजाळ यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. हेमंत गायकवाड आणि सचिन शेजाळ या दोघांची देहूरोड पोलिस ठाण्यात नियुक्ती केली होती. देहूरोड पोलिसांच्या तपास पथकात ते कार्यरत होते. तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सोहम धोत्रे यांचा वचक न राहिल्याने हेमंत गायकवाड आणि सचिन शेजाळ यांनी पोलिस दलाची प्रतिमा मलीन होईल, असे कृत्य केले.दरम्यान, देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली. देहूरोडच्या तपास पथकाकडून अवैध धंद्यांना बसवणे आवश्यक होते. मात्र, गुन्हे शाखेने कारवाई केली. या कारणांमुळे पोलिस उपनिरीक्षक सोहम धोत्रे यांना निलंबित करण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم