Hanuman Sena News

सकल धनगर समाज मलकापूर च्या वतीने तहसील चौक येथे रास्ता रोको करण्यात आले...



मलकापूर:दि 7/2/2024 बुधवार धनगर समाज आरक्षण अंबलबजावणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणकर्ते नंदूभाऊ लवंगे यांचा उपोषणाचा आजचा 9 वा दिवस आहे,तरी हे प्रशासन सरकार त्यांच्या उपोषणाशी गांभीर्याने दखल घेत नाही. त्यांच्या समर्थनार्थ आज मलकापूर मध्ये तहसील  चौकात रास्ता रोको करण्यात आला यावेळी चौफेर गाड्यांच्या रांगाचरांगा लागल्या होत्या, संपूर्ण परिसर येळकोट येळकोट जय मल्हार च्या घोषणाने दुमदुमला होता, यावेळी प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यात आले. यावेळी मल्हार सेनेचे पदाधिकारी तसेच ,रवींद्र कवळकर ,विनय काळे,महादेव लटके, अमोल फासे,गजानन वाघ,गजानन बोरसे, अनिल पाचपोळ ,बंडू वैतकार, मंगेश गावंडे ,ज्ञानेश्वर लवंगे, स्वप्नील कवळे ,सोमेश खराटे, दीपक बोरसे ,ऋषिकेश नेमाडे,कृष्णा सुशिर, निलेश सोनोने, गणेश सुशिर,सचिन कवळे,धीरज नागे,विशाल कवळे,सौरभ चिकटे, शिवप्रसाद पाचपोर विनायक सपकाळ, व समस्त धनगर समाज बहुसंख्येने उपस्थित होते,

Post a Comment

أحدث أقدم