Hanuman Sena News

गैरआदिवासी जातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र(एस.टी ) देण्यात येऊ नये.आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन..




मलकापूर: दि. 05/02/2024 उपविभागीय अधिकारी साहेब मलकापूर, जि. बुलढाणा यांना आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.गैर आदिवासी जातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (एस.टी.) देण्यात येऊ नये, तसेच कोणत्याही शासकीय योजना साठी जात वैधता प्रमाण प्रत्र अनिवार्य करणे बाबात बुलढाणा जिल्ह्यामध्ये ६ उपविभागीय स्थरावर खऱ्या आदिवासी समाजावर अन्याय करुन नाम साधर्मीयाचा फायदा घेऊन गैर आदिवासी जातीतील काही समाज अनुसूचित जमातीचे खोटे दस्तऐवज तयार करुन प्रमाणपत्र मिळवितात. त्याप्रमाणपत्राद्वारे खऱ्या आदिवासीवर अन्याय करुन सरकारी नोकरी व योजना यांचा लाभ घेत आहेत. अशा गैरआदिवासी वर कायदेशीर कारवाई करावी व त्यांची खोटे मिळवलेले जात प्रमाणपत्र जमा करावे. वास्तविक पाहता बुलढाणा जिल्हा मधे कोळी समाजाला स्पेशल (एस.बी.सी.२%) आरक्षण देण्यात आलेले आहे. तसेच नायकडा समाजाला (व्ही.जे.) चे आरक्षण देण्यात आलेले आहे. तरी सुध्दा त्या जाती अनुसूचित जमातीचे (एस.टी.) चे प्रमाणपत्र मागणी करीत आहेत. त्यांची मागणी ही गैर कायदेशीर असून अशा गैर आदिवासींना महसूल प्रशासनाने पाठीशी घालु नये व खऱ्या आदिवासी वर अन्याय होणार नाही यांची प्रशासनाने दक्षता घेण्यात यावी व गैर आदिवासी यांनी खोट्या अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रावर शासकिय लाभ घेतले असतील अशा व्यक्ती व लाभार्थी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. तसेच अनुसूचित जमातीचे दाखले देण्यासाठी शासन निर्णया नुसार १९५० च्या आधिच्या वैध पुराव्याची पडताळनी करावी अन्यथा आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाभर उपविभागीय महसूले कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्यात येईल. याची दक्षता प्रशासनाने घ्यावी.यावेळी विनोद डाबेराव, संतोष चव्हाण, निलेश सोळंके ,हरसिंग राणे, अतुल  जाधव, दिनेश जाधव,संदीप डाबेराव ,सुरेश चव्हाण, संदीप खुराडे ,गुलाबसिंग सोनोने, हरसिंग डाबेराव, राजेंद्र डाबेराव, संदीप खुराडे, सौ रत्नकला चव्हाण,सौ मथुरा सोळंके, सौ चंद्रभागा सोळंके,सौ दुर्गाबाई चव्हाण,सौ गुंताबाई चव्हाण, सौ शोभाबाई चव्हाण,सौ मनकर्णाबाई चव्हाण,सौ सुमनबाई चव्हाण, शेषराव सोळंके, गजानन चव्हाण, राहुल चव्हाण, महेश सोळंके, उल्हास शेले, पुरुषोत्तम भारीकर ,गुलाब सिंग सोनवणे इत्यादी आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم