नांदुरा: मकर संक्रात सण उत्साहात साजरा केल्या नंतर चाहूल लागते ती हळदी- कुंकवाची, सौभाग्यवती स्त्रिया एक-दुसरीच्या घरी जाऊन मोठ्या उत्साहाने हळदी -कुंकू करतात, संक्रातीपासुन रथसप्तमी पर्यंत सगळीकडे आल्हाददायी दृश्य आपल्याला दिसून येते. अशा या आनंदोत्साहापासुन काही स्त्रियांना विधवा असे नाव देऊन त्यांचा काही दोष नसुन सुद्धा त्यांना त्यांच्यावर दोशपत्र ठेऊन त्यांची इच्छा असून सुद्धा अश्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकत नाही. आजच्या या विज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने आपली छाप उमटवत चंद्रा पर्यंत झेप घेतली आहे, तरी सुद्धा असे घडते आहे म्हणुन काल बुधवार दि. ३१/०१/२०२३ रोजी शिवसेना शहर प्रमुख अनिलभाऊ जांगळे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने एक आगळे वेगळे हळदी - कुंकू साजरे केले, हळदी कुंकू कुणाच्याही घरी न करता पंचवटी येथील मरी- माता या मंदिरात करण्यात आला.मरी माताची पूजा करून वाण अर्पण करून मातेचा आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमाला सुहासिनी महिलांसोबतच विधवा महिलांना सुद्धा आमंत्रित आले. सुहासिनी महिलांना हळदी - कुंकू व वाण देऊन सर्व विधवा महिलांना अष्टगंध लावून प्रत्येकी एक साडी व भेटवस्तु देण्यात आली. शिवसेना महिला शहर प्रमुख सौ सरिता बावस्कार यांनी उपस्थित सर्व महिलांना मोलाचे संबोधन केले "विधवा महिला ह्या कर्तृत्ववाण असून आपल्यातला एक हिस्सा आहे, या महिलांना मान- सन्मानाने आपल्या सोबत घेऊन पुढे चालणे हे प्रत्येक स्त्री सोबतच संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे" असे म्हणत विधवा महिलांना होत असलेला त्रास त्यांचे कष्ट, त्याग याबाबतीत भावना व्यक्त करत असतांना काही स्त्रीया भावुक झाल्या व त्यांचे अश्रू अनावर झाले . उपशहर प्रमुख सौ प्रज्ञा तांदळे यांनी सुद्धा स्त्रियांना मोलाचे मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व स्त्रियांनी सरिताताईंच्या विचारांना व शब्दांना मान देऊन भविष्यात विधवा महिलांना आपल्या सोबत घेऊन चालण्याचा संकल्प केला. स्त्रियांनी उखाणे घेत कार्यक्रम उत्साही व आनंददायी बनवला. उपस्थित सर्व महिलांचे आशीर्वाद घेण्यात आले. सर्वांनी वंदनिय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मरण केले. ' जय - श्रीराम,नारी शक्तीचा विजय असो 'असे नारे देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी महिला आघाडीच्या लक्ष्मी वसाने, स्वाती पारधी,रुपाली घोपे,विजया गोरे, वाकूळकरताई,कांचन बावस्कार,..यांच्या सह इतर महिला शिवसैनिक उपस्थित होत्या. कु दुर्गा मुरेकर व कु धनश्री दाभाडे यांचे या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले.. शिवसेना महिला आघाडीने घेतलेल्या अशा प्रकारच्या नावीन्यपूर्ण हळदीकुंकवा च्या कार्यक्रमाची पंचक्रोशीत सर्वत्र उत्साही चर्चा होत आहे.
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आगळे वेगळे हळदी - कुंकू साजरे: विधवा महिलांना देखील दिला सन्मानाचा अहेर...!
Hanuman Sena News
0
إرسال تعليق