मलकापूर: मा.आ.श्री चैनसुखजी संचेती यांच्या पुढाकाराने मलकापूर मतदार संघातील युवकांसाठी दि ११ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता , गणपती नगर येथील चैनसुखजी संचेती यांचे निवासस्थानी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन श्री यश सुरेशजी संचेती (जिल्हा अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा) यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून २०० पेक्षा जास्त युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. सदर मेळाव्यामध्ये निवड झालेल्या युवकांना नागपूर येथील विविध सुप्रसिद्ध कंपनी मध्ये नोकरी मिळणार आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे.गरजू युवकांनी येताना आपले आधार कार्ड, बॅंक पासबुक, दोन फोटो, शैक्षणिक कागदपत्रासह (झेरॉक्स) सह उपस्थित राहावे . नियुक्ती झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय विमा (ESIL) पी एफ (PF) व नोकरीच्या ठिकाणी राहण्याची व जेवण्याची व्यवस्था कंपनी कडून करण्यात येणार आहे.तरी मलकापूर व नांदूरातील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान श्री यश संचेती जिल्हा अध्यक्ष भाजप युवा मोर्चा यांच्या कडून करण्यात आलेला आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क 9800400527, 9604027418, 9309104873
إرسال تعليق