मलकापूर दि.-26 जानेवारी,
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात मलकापूरची गौरी सोळुंके हिला सन्मानित करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा
ध्वजारोहन कार्यक्रमानंतर जिल्ह्यातील गुणवतांचा सत्कार मा. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडाधिकारी यांचेद्वारे करण्यात आला. या कार्यक्रमात मलकापूर येथील ली.भो. चांडक विद्यालयाचे सहा.शिक्षक मंगलसिंह सोळंके यांची कन्या कु. गौरा हिला दि. 9ते 20 ऑगस्ट 2022 या कालावधीत लंडन येथे आयोजित कॅडेट कॉमनवेल्थ फेसींग चॅम्पअनशिप मध्ये बुलडाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून भारतीय संघाला तृतीय स्थान प्राप्त करून दिल्याबद्दल तिला हे गौरव पत्र देवून मा. पालकमंत्री वळसे पाटील व आ. संजय गायकवाड यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.कु.गौरी ही आसाम-गुहावटी येथे चॅम्पीअनशिप स्पर्धेसाठी गेलेली असल्यामुळे ते सन्मानपत्र तिचे वडील मंगलसिंह सोळंके यांनी स्विकारले कु. गौरी ही अत्यंत कुशल खेडाळू असून भविष्यात जिल्हयाचे नावलौकिक नक्कीच वाढवेल ही सर्वांना अपेक्षा आहे.नगरात सर्वत्र कु. गौरीचे कौतुक होत आहे.
إرسال تعليق