Hanuman Sena News

मोहनराव नारायणा नेत्रालय व ओम शांती ऑप्टिकल तसेच हनुमान सेना मलकापूर तर्फे नेत्र व हृदयरोग शिबिर संपन्न...



मलकापूर: मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा-शाखा मलकापूर तसेच व्हिजन सेंटर व ओम शांती ऑप्टिकल यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दि. १४/०१/२०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता मोफत नेत्र व हृदयरोग शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार मा.श्री.संदीप काळे साहेब तसेच प्रमुख उपस्थिती सुप्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ. युसुफ खान, मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा येथील डॉ.मारोती देशमाने,व्हिजन सेंटर चेऑप्टोमेट्रीस्ट ऋषिकेश लिंगोट हे उपस्थित होते. सर्व प्रथम ओम शांती सेवा समिती व ओम शांती ऑप्टिकल चे संचालक सचिन भंसाली, रक्तदान कार्यात व विविध सामाजिक कार्यात अग्रेसर हनुमान सेनेचे अमोलभाऊ टप, पत्रकार धर्मेशसिंह राजपूत यांचे कडून मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मा.ठाणेदार संदीप काळे यांनी शिबिरामध्ये उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करीत शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच हृदय रोग तज्ञ डॉ. युसुफ खान यांनी हृदयरोगासंबंधी माहिती व उपचार याविषयी मार्गदर्शन केले.त्यानंतर मा. ठाणेदार संदीप काळे व डॉ. युसुफ खान यांनी आपली नेत्र तपासणी करून शिबिराला सुरुवात केली. त्यानंतर उपस्थित नेत्र व हृदय रोग रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.या शिबिरासाठी ओम शांती सेवा समिती व व्हिजन सेंटर मलकापूर,हनुमान सेना मलकापूर चे कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم