मलकापूर:अनेक तरुणांचे स्वप्न साकार झाले, गरजूंना रोजगार मिळाले.! नियुक्ती झालेल्या अनेक यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन केले.आज ११ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता,माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यश सुरेश संचेती यांच्या माध्यमातून मलकापूर येथील युवकांसाठी गणपती नगर येथील चैनसुख संचेती यांच्या निवासस्थानी रोजगार मेळाव्याचे आयोजन भाजपा युवा मोर्चाच्या वतीने यशस्वीरित्या करण्यात आले. ह्या मेळाव्याच्या माध्यमातून 200 हून अधिक युवकांना रोजगाराची संधी मिळाली आहे.ह्या मेळाव्यातून नियुक्ती झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय विमा पीएफ व नोकरीच्या ठिकाणी राहण्यासह जेवणाची व्यवस्था कंपनीकडून करण्यात येणार आहे.मलकापूर मधील युवकांनी मोठ्या संख्येने ह्या रोजगार मेळाव्याला उपस्थिती दर्शवली. ह्या संधीचा लाभ घेण्यासाठी ह्या मेळाव्यात अनेक युवक उत्साहाने सहभागी झाले होते. ह्यापैकी अनेकांच्या हाताला रोजगार मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून ह्या आयोजनासाठी घेतलेल्या परिश्रमांच सार्थक झाल्यासारखं वाटलं.अकुशल कामगार रोजगार मेळावा ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.आ.चैनसुखजी संचेती यांनी भूषवले.तसेच ह्या मेळाव्यात भाजप शहराध्यक्ष शंकरकाका पाटील, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव शिवराजजी जाधव, ब्रम्हानंद भाऊ चौधरी आदी मंचावर उपस्थित होते.सोबत प्रवीण भाऊ पाटील,निखिलेशजी झंवर, दिनेश भाऊ राऊत, निंबाजी सोनोने , मयुरजी बघे, निलेश भाऊ जैस्वाल,सानी भाऊ तेलंग मेळाव्याला उपस्थित होते.
मलकापूर येथे अकुशल कामगार रोजगार मेळावा संपन्न!..
Hanuman Sena News
0
إرسال تعليق