बुलढाणा : एकीकडे देशावर १५० लाख कोटी रुपयांचे कर्ज असतानाच देशाचा जीडीपी चीन, अमेरिकेपेक्षा अधिक असल्याचा दावा करत गेल्या दहा वर्षांत देशाचे दरडोई उत्पन्न ९० हजारांवरून १ लाख ८८ हजारांवर गेले आहे. जवळपास दुपटीने त्यात वाढ झाल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी येथे सांगितले.बुलढाणा येथे विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त ८ जानेवारी रोजी ते आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला तेव्हा हे वक्तव्य त्यांनी केली. यावेळी आ. संजय गायकवाड, श्वेता महाले, माजी आ. चैनसुख संचेती, माजी आ. विजयराज शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. कोविडनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेने वेग घेतला असून, महागाईचा दरही कमी झाल्याचे कराड म्हणाले. पायाभूत सुविधांचा वेग वाढत आहे.देशाने विकासाकडे वाटचाल केली असून, इंग्रजकालीन गुलामीची चिन्हे दूर सारून भारतीय दृष्टिकोन जपत विकासाचा मार्ग आपण पादाक्रांत करत आहोत. त्यामुळेच कायद्यामध्येही त्यानुषंगाने ३९ हजार सुधारणा केल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे ज्या पद्धतीने पायाभूत सुविधांच्या कामांनी वेग घेतला आहे ते पाहता जनसामान्यांच्या राहणीमानात वाढ होऊन विकासाची संकल्पना स्पष्ट होत आहे. महसुली उत्पन्नही वाढले आहे.पूर्वी दहाव्या क्रमांकावर असलेली आपली अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर आली असून, २०२६ पर्यंत ती तिसऱ्या स्थानावर जाईल, असे केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले. केंद्रात २०१४ मध्ये आम्ही आलो तेव्हा देशाचे बजेट १६ लाख कोटी रुपयांचे होते, ते आज ४५ लाख कोटींच्या घरात गेले आहे. अर्थात त्यातही तिपटीने वाढ झाल्याचे कराड म्हणाले.विकसित भारत संकल्प यात्रेला काही ठिकाणी रोखले जात आहे. यासंदर्भाने विचारले असता हे काम महाविकास आघाडीचे असल्याचा आरोप त्यांनी अनुषंगिक विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला.
चीन,अमेरिकेपेक्षा भारताचा जीडीपी अधिक - राज्यमंत्री डॉ.भागवत कराड
Hanuman Sena News
0
إرسال تعليق