Hanuman Sena News

पोलीस वर्धापन दिनानिमित्त डी.ई.एस.हायस्कूल दाताळा येथे सायबर जनजागृती कार्यक्रम संपन्न...



मलकापूर: दि.5 जानेवारी 2023 रोजी पोलीस वर्धापन दिनानिमित्त डी ई एस हायस्कूल दाताळा येथे सायबर जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.सदर कार्यक्रमासाठी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री संदीप काळे साहेब, पो.हे.का सचिन दासर,  संदीप राखुंडे तसेच सायबर पोलीस स्टेशन   बुलढाणा चे भारत जंगले साहेब व सुनील सोळंके साहेब तसेच उपप्राचार्य ए.पी.बोरसे तसेच शिक्षवृंद उपस्थित होते.ठाणेदार संदिप काळे यांनी  बालपणी आपल्या हातून बालगुन्हे होऊ नये याबद्दल आपण जागृत राहावे. मोबाईल वरील गेम खेळताना वैयक्तिक माहिती देऊ नये.याबद्दल  सविस्तर माहिती देऊन विद्यार्थांना मार्गदर्शन केले. तसेंच भारत जंगले साहेब यांनी सायबर गुन्हे, सोशल मीडियावरील गुन्हे याबद्दल विद्यार्थ्यांना जागृत केले.सूत्रसंचालन डी बी खर्चे यांनी केले.तर आभार प्रदर्शन डी एच राणे यांनी केले.कार्यक्रमासाठी  सर्व शिक्षक व विद्यार्थी  उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم