Hanuman Sena News

नवीन मोटर वाहन कायद्याविरोधात मलकापुर हायवे क्रमांक सहावर चक्काजाम, टायर पेटवून आंदोलन...



मलकापूर: राज्यभरात आज सकाळपासून ठिकठिकाणी ट्रकचालक रस्त्यावर उतरून आंदोलन करतांना पाहायला मिळत आहे. कुठे चक्का जाम केला जात आहे, तर कुठे टायर पेटवले जात आहे.केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होतांना पाहायला मिळत आहे.त्यामुळे अनेक महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रकचालकास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. दरम्यान याच कायद्याला देशभरात विरोध होत असून, ट्रकचालक थेट रस्त्यावर उतरले आहे.अपघातानंतर जखमींना मदत न करता पळून जाणाऱ्या वाहन चालकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, या केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाच्या विरोधात ट्रकचालक हे चक्काजाम आंदोलन करत आहेत. या कायद्यात वाहन चालक खास करून ट्रक चालकांविरोधात एकतर्फी कारवाईची तरतूद करण्यात आली असल्याचा आरोप होत आहे.अपघाताच्या स्थळावर थांबल्यावर चूक नसतांना देखील लोक ट्रकचालकाला मारहाण करतात.मलकापुर येथिल ट्रक चालक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मलकापूर-बेलाड नजिक रस्त्यावर टायर जाळून महामार्ग अडवण्यात आला आहे. गेल्या एक तासांपासून महामार्ग अडवून वाहन चालकांची घोषणाबाजी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अपघात झाल्यानंतर पळून जाणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या नवीन नियमाला वाहन चालकांनी यावेळी विरोध केला आहे. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून, पोलिसांनी आंदोलनस्थळी चालकांवर कारवाई केली. यावेळी चालक संघटनेचे भानुबाई, हेमंत शर्मा ,तसेच सल्लागार अॅड स्नेहल तायडे,  पिंटू इंगळे, हरीश दंड, मुराद भाई ,राजू चोपडे, जब्बार भाई, संतोष भदाले, जीवन दिवाके, प्रवीण देशमुख, प्रमोद सातव, आसिफ भाई, प्रवीण मोरे, अतुल चव्हाण, पवन पाटील, आकाश इंगळे, सागर तायडे श्रीकृष्ण आमले, विशाल बछिरे, शेख कलीम, शे.जावेद, गफार भाई कादिर शे, युसुफ भाई, अनिसभाई, इत्यादी  आंदोलन करते उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم