Hanuman Sena News

महाराष्ट्र पोलिस दलाचा 62 वा वर्धापन दिन मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे साजरा...


मलकापूर:   २ जानेवारी १९६१ रोजी भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता. त्यामुळे २ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दिन म्हणून साजरा केला जातो. सागरी धोके, नक्षलवाद, सायबर गुन्हे यांसारख्या आव्हानांमुळे पोलिसांनी दुप्पट सतर्क राहणं गरजेचं आहे,पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्ते सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य तसंच देश अधिक सुरक्षित करावा असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी साहेब यांनी केलं.सायबर गुन्हे रोखण्यासाठी तसंच महिला, लहान मुलं आणि आणि ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याच त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.अरविंदजी कोलते उपस्थित होते.सुरुवातीला उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी साहेब व ठाणेदार संदीप काळे यांनी वर्धापन दिन संचलनाकडून मानवंदना स्वीकारली.तसेच पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदीप काळे साहेबांनी रक्तदान केले. संपूर्ण कर्मचारी वृंदांनी रक्तदानाचे आयोजन केले होते त्यात एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले.अल्पेश फिरके ,प्रकाश कोळी, रामेश्वर वाघमारे, विक्रम सिंह राजपूत, संदीप राखुंडे, स्वप्नील कावळे, रघुनाथ जाधव, श्याम कुमार राजगुरे ,विनोद वाघोदे ,गणेश सावे ,संदीप खोमने,दिलीप तडवी, सौ.नीता मोरे ,सौ.स्वाती खर्चे ,आशिष क्षीरसागर, बादल पाटील ,राजेंद्र मोरे ,विशाल इंगळे, अखिल शहा अली शहा, सौरभ चिकटे ,अक्रम शहा लुकमान शहा,शेख युसुफ शेख इस्माईल, अजित किणगे,अक्षय वराडे, सचिन कवळे,प्रफुल्ल भारंबे, योगेश निकम, नरेश ठाकूर, जगन्नाथ काटे, शेख कलीम शे वहिद ,आकाश सपकाळ,आकाश तायडे इत्यादींनी रक्तदान केले व विशेष सहकार्य देवधाबा येथील पशुवैद्यकीय डॉ.फोपसे तसेच हनुमान सेनेचे अमोल भाऊ टप व नानाभाऊ येशी,पत्रकार बांधव व दिव्यांग फाऊंडेशन, खर्चे लॅबच्या टीमचे सहकार्य विशेष लाभले.

Post a Comment

أحدث أقدم