मलकापूर : जिल्हा मधील गौरक्षण मध्ये कतलीस जाणाऱ्या गाई, भाकड गोवंश, यांचे प्रमाण दिवसेन दिवस वाढत आहे त्या मानाने गोशाळा कमी आहे आणि सूरू असल्या गोशाळा मध्ये त्यांच्या क्षमते पेक्षा जास्त गोवंश आहे तसेच त्या गोवंस यांचा चारापाणी, वैद्यकीय सुविधा यांचा खर्च गोशाळा संचालक यांच्या क्षमचेच्या पार जात आहे. सदर विषया बाबत दिनांक 30 जानेवारी रोजी जिल्हा अधिकारी बुलढाणा यांना विश्व हिंदू परिषद, बजरंगदल तथा समस्त गोशाळा यांच्या वतीने आज बुलढाणा येथे देण्यात आले सदर निवेदन मध्ये प्रमुख तीन मागण्या केलेल्या आहे 1) शालेय पोषण आहारात अंडी देणे टाळावे.२) गोसेवा आयोगाच्या माध्यमातुन गोशाळेस प्रति जनावर १००/-रु. रोज प्रमाणे अनुदान द्यावे ३) केन्द्र शासनाव्दारे देण्यात आलेल्या पशु एंबुलन्स तात्काळ शुरु करावे.याबात निवेदन मध्ये नमूद केले आहे की नुकतीच महाराष्ट्र शासनाने शालेय पोषण आहारामध्ये अंडी देण्या संदर्भातील परीपत्रक काढले आहे. हयामुळे शाकाहारी प्रवृत्तीच्या पाल्यांची कुचंबना होत आहे तरी हया परीपत्रकात बदल करुन अंडी ऐवजी देशी गाईचे दूध देण्यासंदर्भात सुधारणा करावी.आपल्या राज्यात गोसेवाआयोगाची स्थापना होऊन सहा महीण्याचा कालावधी झालेला आहे तरी अद्याप पावेतो गोशाळेतील गोवंशाना चारापाण्याकरीता कोणत्याही प्रकारचे अनुदान अद्यापपावेतो शासनातर्फे शुरू करण्यात आलेले नाही. तरी इतर राज्याप्रमाणे आपल्याही येथे प्रति गोवंश प्रतिदिन १००/-रु. प्रमाणे अनुदान देण्यात यावे जेणेकरून गोसेवे करीता थोडीफार आर्थिक मदत होइल.केंद्र शासनाने पशुंच्या आरोग्य तपासणीकरीता एंबुलन्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत तरी त्या तातडीने कार्यान्वीत करण्यात याव्यात.वरील नमुद तिन्ही विषयाकडे आपण जातीने लक्ष देऊन आमच्या शाकाहार संदर्भातील भावनांचा व पशुकल्याण भावनांचा शासन दरबारी आमचे प्रतिनीधी म्हणून पोटतिडकीने विषय मांडावेत ही विनंती निवेदन द्वारे केली आहे.सदर निवेदन प्रतिलीपी द्वारें उपविभागीय अधिकारी साहेब मलकापूर, मा. खासदार रक्षाताई खडसे तसेच मा. आमदार राजेशजी एकडे यांना दिले आहे.
गोसेवा आयोग द्वारे प्रती गोवंस 100रु प्रतीरोज गोशाळा यांना अनुदान मिळावे विश्व हिंदू परिषद ,श्रीहरी गोशाळा मलकापूर यांची जिल्हा अधिकारी बुलढाणा यांना मागणी
Hanuman Sena News
0
إرسال تعليق