Hanuman Sena News

आ.संजय गायकवाड यांच्या प्रयत्नाने बुलढाण्यात धावणार रेल्वे...


बुलढाणा: सध्या परिस्थिती महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर बुलढाणा विधानसभा मतदार संघाचा बोलबाला आहे. त्याला कारण ही तसं आहे. आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा विधानसभा मतदार संघाचा चेहरा मोहरा बदला आहे.आज त्यांनी मतदारसंघातील जनतेला गुड न्युज दिली आहे. बुलढाण्यात रेल्वे येणार असुन या नवीन मागणी नुसार पुढील महिन्यात या मार्गाचे सर्वे होणार आहे. या बाबतची माहिती आज आमदार संजय गायकवाड यांनी आज 21 डिसेंबर 2023 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना आमदार गायकवाड म्हणले की मलकापूर- बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर असा रेल्वे मार्ग असल्याची माहिती आमदार गायकवाड यांनी दिली आहे.

Post a Comment

أحدث أقدم