मलकापूर : गत पाचशे वर्षा पासूनच्या प्रत्येक रामभक्त, संत महंतांच्या संघर्षाला आलेलं फळ म्हणजे विक्रम संवत 2080 पोष शुक्ल पक्ष द्वादशी 22 जानेवारी 2024 प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येत गर्भगृह मध्ये विराजमान होत आहेत. या ऐतिहासिक क्षणाला घरोघरी आनंद उत्सव साजरा करून दीपावली साजरा करा असे प्रतिपादन संतोषी निर्मोही आखाड्याचे महंत कन्हैयादास गुरु वासुदेवदास गादीपती उत्तराधिकारी चिनावल यांनी, अक्षदा वितरण सोहळ्याप्रसंगी केले.अयोध्या नगरी येथून आलेल्या पूजीत अक्षदा कलश संपूर्ण नगरीत घरोघरी वितरित होण्याच्या उद्देशाने आज शहरातील मातृ मंडळ येथे संत, महंत महात्म्यांच्या उपस्थितीत या अक्षता कलशांचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी आयोजित सोहळ्याला प्रमुख उपस्थिती तथा मार्गदर्शक म्हणून महंत कन्हैयादास गुरु वासुदेव दास गादीपति उत्तराधिकारी चिनावल, ह.भ.प यशवंत महाराज पोफळी , ह.भ.प .कैलास महाराज धोरण उमाळी, ह.भ. प.शंकर महाराज खोडके भाडगणी , ह.भ.प.आत्माराम महाराज अत्तरकार तालखेड , ह.भ.प.विजय महाराज पाटील दुधलगाव, यांच्यासह दामोदरजी लखानी, राजेशजी महाजन, श्रीकृष्ण तायडे,संमती जैन,सौ.नेहा ताई सदावर्ते आदींची उपस्थिती लाभली. तालुक्याचा अक्षता कलश भातृ मंडळ येथे आणण्यात आल्यानंतर १७ डिसेंबर रोजी भातृ मंडळ येथील श्री.राम मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात अभियान गीताने कुटे ताई द्वारे यांनी केली उपस्थित महात्म्यांनी मार्गदर्शन केले. व त्यानंतर पूजित अक्षतांचे संपूर्ण तालुक्यानुसार 45 भागात वितरण तर नगर मध्ये 46 उपवस्ती मध्ये वितरण करण्यात आले. त्यानंतर भातृ मंडळ परिसरात श्रीराम मंदिराला प्रदक्षिणा घालून टाळ मृदुंगाच्या गजरात शोभायात्रा प्रभु श्री राम यांचे भजन व विजय महामंत्र च्या जयघोष मध्ये काढण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये अभियान तालुका सह संयोजक संजय गावंडे यांनी करतांना सांगितले की आज वितरित अक्षता कलश आपण आप आपल्या वस्ती व गावातील मंदिराला केंद्र करुन 31 डिसेंबर पर्यंत पूजा करावी व नंतर 1ते 15 जानेवारी पर्यंत घरो घरी वितरण व निमंत्रण मेरा गाव मेरी अयोध्या भाव मानून करने आहे व 22 जानेवारीला स्थानीक मंदिर मध्ये सकाळी 11ते दुपारी 1 दरम्यान उपस्थित राहून अयोध्या येथिल प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा विजय महामंत्र, सुंदरकांड,हनुमान चालीसा पठण करावे व भव्य दिव्य दिवाळी साजरी करावी व तेथे ते अर्पित करावे असे संबोधन केले तर संचालन अभियानाचे नगर संयोजक विशाल दवे यांनी केले. आभार प्रदर्शन मोहन सिंह राजपूत यांनी केले. या वितरण सोहळ्याच्या यशस्वी ते करिता श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या अक्षता कलश वितरण समिती मलकापूर च्या समस्त कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.२२ जानेवारी रोजी प्रत्येकाने भव्य दिव्य ना भूतो ना भविष्यती असा दीपोत्सव साजरा करावा असे महंत कन्हैयादास महाराज यांनी सांगितले.
अयोध्या येथून आलेल्या पूजीत अक्षता कलश वितरण सोहळा ;श्रीरामांच्या जयघोषाने व साधू संत यांच्या उपस्थितीत संपन्न..
Hanuman Sena News
0
إرسال تعليق