Hanuman Sena News

तार गाळणाऱ्या हातभट्टीसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त!


नांदुरा वीज तार चोरीच्या अनेक घटना

नांदुरा : महावितरण कंपनीच्या चोरी केलेल्या वीजतारांना लाकडाच्या भट्टीत वितळवून त्याचे पत्रे तयार करणाऱ्या आरोपीला हातभट्टी आणि मुद्देमालासह पोलिसांनी खामगाव रोडवरील नांदुरा - (खुर्द) शेतशिवारात असलेल्या एका गोदामातून जेरबंद केले आहे.पोलिसांना प्राप्त माहितीवरून त्यांचे पथक व वीज कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याचा प्रतिनिधीसह घटनास्थळी छापा टाकण्यात आला. तेथे वीजवितरण कंपनीच्या वीजतारांची बंडल तसेच भट्टीत तारा वितळवून तयार केलेले पत्रे आढळून आले. यावेळी आरोपी शेख सोहेल शेख मुक्तार (२०, रा. कुरेशी नगर, नांदुरा) याच्या ताब्यातून उच्च व लघुदाब विद्युत वाहिनीचे १३ अल्युमिनियम तार बंडल एकूण २६३ किलो, तार वितळवून तयार केलेले २९ पत्रे, विद्युत तार वितळविण्यासाठी उपयोगात येणारी लोखंडी कढई, एक लांब दांडीचा लोखंडी चमचा, एक इलेक्ट्रिकै वजन काटा असा एकूण एक लाख चार हजार नांदुरा तालुक्यात रोस्टर पद्धतीप्रमाणे विद्युत पुरवठा चालू बंद असतो. त्यामुळे कोणत्या फीडरवर वीजपुरवठा बंद आहे किंवा चालू आहे, याची माहिती महावितरणच्या संबंधित लोकांना असते. तसेच वीजपुरवठा सुरू असताना शेतकरी पिकांना पाणी देतात. नेमके ज्या फीडरवर विद्युत पुरवठा बंद असतो त्याच फीडरवरील वीज तार चोरून नेत चोरटे कार्यभाग साधतात. त्यामुळे झारीतील शुक्राचार्य शोधण्याचे मोठे आव्हान पोलिस प्रशासनासमोर आहे.२०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. आरोपीवर विद्युत अधिनियमाच्या कलम ४१(१) (ड), भादंविच्या कलम ३७९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात पोलिस अंमलदार मिलिंद जवंजाळ, कैलास सुरडकर, विनायक मानकर, अनिल धीरबसी, सुनील सुशीर, रवी सावळे, रवी झगरे, विनोद भोजने यांनी केली.

Post a Comment

أحدث أقدم