Hanuman Sena News

जिल्ह्यात वाढतेय बालमजुरांची संख्या; गॅरेज, हाॅटेलमध्ये बाल कामगारांची संख्या जास्त बालकामगार ठेवाल तर कोठडीत जाल...

खामगाव : हॉटेल, शेतीकामे, वीटभट्टी, ऊसतोड आदी उद्योगात, कामाच्या ठिकाणी बाल कामगार ठेवले जात असल्याचे समोर येते. बालकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणे, त्यांचा कामासाठी होणारा वापर संपुष्टात यावा, यासाठी प्रयत्न केला जातो. जिल्ह्यात कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हे या दलाचे प्रमुख आहेत. वेळोवेळी कृती दल प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली सभा घेऊन छापासत्रातून बालकामगारांचा शोध घेण्यात येतो. बालकामगारास कामावर ठेवल्यास संबंधित मालकास दोन वर्षे तुरुंगाची हवा खावी लागते.बालकामगार ठेवला तर खबरदार कामावर बालकामगार ठेवल्याप्रकरणी कलम १४ नुसार संबंधित मालक, मुख्य मालक व कंत्राटदार दोषी आढळल्यास ६ महिने ते २ वर्षे किंवा २० हजार ते ५० हजार रुपये अथवा दोन्ही एवढ्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे कोणीही कामावर बालकामगार ठेवल्यास अशांवर कारवाई करण्याचा इशारा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाने दिला आहे.जिल्ह्यातील कोणत्याही आस्थापनेवर बाल कामगार काम करीत असल्याचे निदर्शनास आल्यास सुज्ञ नागरिकांनी जवळच्या पोलिस ठाणे, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालय बुलढाणा किंवा १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.जिल्हा कृती दलाने जानेवारी २०२२ ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत एकूण अनेक छापासत्र आयोजित केले. छापासत्रादरम्यान अनेक आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. या दरम्यान काही बालकामगारांची मुक्त्तता करण्यात आली. संबंधित आस्थापना मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.कोणत्याही आस्थापनेवर बालकामगार कामावर ठेवणे हा कायद्यान्वये फौजदारी गुन्हा ठरतो. एखाद्या आस्थापनेवर बालकामगार काम करीत असल्याचे दिसून आल्यास सरकारी कामगार अधिकारी कार्यालय किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी, तक्रारदारांचे नाव गुप्त ठेवले जाते

Post a Comment

أحدث أقدم