मलकापूर : ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाने स्थापन करावे ह्या मागणीसाठी जालना येथे ब्राह्मण समाजाचे समन्वयक दिपक रणनवरे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला मलकापूर बहुभाषिय ब्राह्मण समाज यांचा पाठींबा देण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी साहेब मलकापूर यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाने स्थापन करावे ह्या मागणीसाठी जालना येथे ब्राम्हण समाजाचे महाराष्ट्र समन्वयक दीपक रणनवरे यांनी २८ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. ब्राह्मण समाजातील मुला मुलींकडे बौद्धिक क्षमता असूनही ते उच्च शिक्षणासाठी लागणारी फी भरु शकत नाही. तसेच उच्च शिक्षणासाठी राहण्याकरीता वसतीगृहे नाहीत. म्हणून परशूराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी , भिक्षुक, पुजारी ब्राह्मण बंधूना इतर राज्याप्रमाणे ५०००/- मासिक मानधन देण्यात यावे , केजी ते पिजी शिक्षण मोफत द्यावे द्यावे व इतर विवीध मागणीसाठी दीपक रणनवरे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला सकल ब्राह्मण समाज मलकापूर ,जिल्हा बुलढाणा यांनी पाठींबा दिला आला आहे.
ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाने स्थापन करावे या मागणीला सकल ब्राह्मण समाज मलकापूर यांचा पाठिंबा...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق