नांदुरा: आज मुलीच्या जन्म झाल्यास संपूर्ण घरात आनंद पसरतो. मुलीच्या जन्मापासून तिचा क्लेश करण्यापासुन ते तिच्या जन्माला साक्षात लक्ष्मीचं आपल्या घरात येणं समजून उत्साह प्रगट करेपर्यंतचा वेळेचा हा प्रवास खरोखरच खुप मोठा आहे. आजच्या काळात मुलगी सुशिक्षित होऊन स्वतःच्या पायावर उभी राहून सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा अप्रतिम ठसा उमटवत आहे. परंतु काही नराधमांच्या अमानुष कृत्यांमुळे माणुसकीला काळिमा फासल्या जाणाऱ्या घटना उघडकीस येताना दिसून येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील ग्राम तरवाडी येथील एका क्रूर नराधमाने निरागस अडीच वर्षाच्या एका बालिकेला चॉकलेट देण्याचे आमिश दाखवून अमानुष अत्याचार करून तिला दगडाने ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवार दि. २३/११/२०२३ रोजी घडली. अश्या या नराधमाला लवकरात लवकर फासावर चढवावे असे निवेदन शिवसेना शहर प्रमुख अनिलभाऊ जांगळे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना महिला आघाडी नांदुरा शहराच्या वतीने आज गुरुवार दिनांक ३०/११/२०२३ रोजी माननीय तहसीलदार साहेब नांदुरा मार्फत १. मा. ना. एकनाथरावजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महा राज्य मंत्रालय मुंबई, २. मा.ना देवेंद्रजी फडणवीस साहेब, गृहमंत्री महा. राज्य मंत्रालय, मुंबई, ३. मा. जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा, ४. मा.अध्यक्ष राष्ट्रीय महिला आयोग बुलढाणा जिल्हा यांना देण्यात आले.'परस्त्री म्हणजे आपली माता' अशी अनमोल शिकवण देणाऱ्या माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्माने पावन झालेल्या या बुलढाणा जिल्ह्यात अशा प्रकारची निंदनीय घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. फाशीची शिक्षा झाल्याशिवाय अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर वचक बसणार नाही.अशा प्रकारचे कृत्य कोठेही घडू नये व संपूर्ण मुली महिला बालिका सुरक्षित रहाव्या त्याकरिता या नराधमाला लवकरात लवकर फाशी द्यावी अशी कळकळीची विनंती शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली. यावेळी शहर प्रमुख सरिताताई बावस्कार, प्रज्ञाताई तांदळे - उपशहर प्रमुख, मंगलाताई सपकाळ, विजयाताई गोरे, सिंधूताई सावकारे,राणी सावळे, दिव्याताई घडेकार, प्राची मंडवाले, जिजाबाई सावकारे, मीरा शिरसाट,गीता गव्हाळे, कांचन बावस्कार शितल शेगोकार, माधुरी पद्मने, पुष्पा चंदनगोळे, गौरी घडेकार,नेहा मंडवाले यांच्यासह इतर शिवसैनिक महिला व मुली उपस्थित होत्या.यावेळी सर्वांच्या वतीने सदर प्रकरणाबद्दल आक्रोश व्यक्त करण्यात आला.
नांदुरा तरवाडी येथिल अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या - शिवसेना महिला आघाडी
Hanuman Sena News
0
إرسال تعليق