Hanuman Sena News

नांदुरा येथे गोवंश पकडले, ६ जनावरांचा मृत्यू





नांदुरा : एका ट्रकमधून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ५० जनावरांची खामगाव पोलिसांनी सुटका केली. तर ६ जनावरांचा मृत्यू झाला. ही कारवाई २६ नोव्हेंबर रोजी खामगाव रोडवरील पेट्रोल पंप समोर नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी केली. वाहनचालक वाहन सोडून पसार झाला.सरकार पक्षाच्या वतीने श्रेणी चंद्रप्रकाश इंगळे यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, कत्तलीसाठी गोवंश घेऊन जात असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली. त्यावरून पेट्रोल पंपासमोर पोलीस स्टाफसह नाकाबंदी करून एम एच ४० सी एम १८०९ क्रमांकाच्या ट्रकला वाहनाला थांबवले. ट्रकला थांबवल्यानंतर चालक वाहन पसार झाला. ट्रकमध्ये ५६ गोवंश आढळले. यात ६ गोवंश मृत्यूमुखी पडले होते. ५० गोवंशाची सुटका करीत त्यांना आमसरी येथील गोरक्षणमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले.राष्ट्रीय महामार्ग शहराच्या बाहेरून गेल्याने जड वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र ट्रक गोवंश घेऊन भरदिवसा शहरातून का जात आहेत. नेमके हे वाहन कुणाचे? आणी कुठून आले? कुठे जात होते, याचा तपास नांदुरा पोलीसांना करायचा आहे.याप्रकरणी पोलीसांनी आरोपी चालकाविरुद्ध कलम ४२९, सहकलम प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणेबाबतचा अधिनियम १९६० च्यानुसार तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५चे कलम, ९ व मोटर वाहन कायद्याच्या कलम १३४अन्वये गुन्हे दाखल केला.अधिक तपास ठाणेदार अनिल बेहराणी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव धंदरे करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم