खामगाव-ओळखीचा फायदा घेऊन मोबाईल मध्ये काढलेले महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन दोघांनी तिच्याकडे पैशांची मागणी केली तसेच घरात घुसून सदर महिलेस मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना स्थानिक सिव्हिल लाईन भागात घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, तिची व नितीन उर्फ बाबू शंकरराव खिरडकर (४५) रा. दालफेल बाची दोन वर्षा पासून ओळख असल्याने ते दोघे बाहेर दर्शनासाठी तसेच जेवणासाठी जात होते. या दरम्यान गैरफायदा घेत खिरडकर हा पीडित महिलेचे फोटो स्वतःचे मोबाइल मध्ये काढत होता. असे असतांना मागील तीन महिन्यांपासून त्यांच्यात वाद निर्माण झाला असून खिरडकर हा या महिलेकडे पैश्याची मागणी करू लागला.तिने पैसे देण्यास नकार दिला असता त्याने मोबाइल मधील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच त्याने व कुणाल कैलास पालीवाल (२४) रा. शिवाजीवेस याने फोन करून अश्लील शिवीगाळ केली. ते दोघे सदर महिलेच्या घरी आले व अश्लील शिवीगाळ करून ५ लाख रूपये दे तुझी सोन्याची पोथ दे, नाहीतर आंम्ही तुझे फोटो वायरल करून तुला बदनाम करु असे म्हणून निघुन गेले. त्यानंतर ते पुन्हा पीडित महिलेच्या घरी आले व भाडेकरू यांच्या घरात घुसले व त्यांना म्हटले की, 'हे आमचे घर आहे, खाली करा नाहीतर पैसे दया नाहीतर तुमचे भांडे घरातुन फेकुन देतो'.आवाज आल्याने ही महिला खाली येवुन त्यांना समजावीत असतांना त्या दोघांनी मारहाण करून या महिलेच्या अंगावरील कपडे फाडले व तुझे मुलीस पळवून नेऊन ठार मारू, अशी धमकी दिली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी नितीन उर्फ बाबू शंकरराव खिरडकर, व कुणाल कैलास पालीवाल या दोघांविरुद्ध कलम ३८४, ३५४, ४५२, २९४, ३२३,३४ भादंवी नुसार गुन्हा दाखल केल
फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेकडे पैशाची मागणी, मारहाण करून केला विनयभंग...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق