मलकापूर: भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत तरुण ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर फातेमा नगर परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली.पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून मृतकाची ओळख पटली नाही.जळगाव खान्देश वरुन नांदुऱ्याकडे जात असताना ट्रकने सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गवरील फातेमा नगर परिसरातील मशिदीसमोर पायदळ जात असलेल्या तरुणाला धडक दिली.त्यामध्ये अज्ञात इसमाचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून जळगाव जिल्ह्यातील ट्रक चालक जाकीर अली ताहेर अली याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द कलम २७९,३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
भरधाव ट्रकच्या धडकेत तरुण ठार..
Hanuman Sena News
0
إرسال تعليق