Hanuman Sena News

शिवसेना महिला आघाडी नांदुरा शहराने नोंदविला स्वच्छतेच्या महाअभियानात सहभाग...


नांदुरा: प्रत्येकजण स्वतःच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत असतो, तसेच आपल्या परिसराच्या स्वच्छतेची सुद्धा काळजी आपण घ्यायला हवी. स्वच्छतेचे महत्त्व समजण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी म्हणजेच २ ऑक्टोबर या दिवशी “स्वच्छता दिन” साजरा केला जातो.  देशात हा दिवस मोठ्या उत्साहात आणि उपक्रमशील पद्धतीने साजरा केला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीत वर्षानुवर्षे असा विश्वास आहे की, 'जेथे स्वच्छता असते तेथे लक्ष्मी निवास करते' आपल्या परिसराची स्वच्छता ठेवणे हे आपले प्राथमिक कर्तव्यआहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी १ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वच्छतेचे महाभियानाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात 'एक तारीख एक तास'  स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड व मुख्यमंत्री सक्षम शहर या स्पर्धेचे आयोजन सुद्धा करण्यात आले. या अनुषंगानेच शिवसेना शहर प्रमुख अनिल जांगळे यांच्या नेतृत्वात महिला आघाडी, नांदुरा शहरच्या वतीने ०१/१०/२०२३ रोजी सकाळी १० वाजता स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. शिवसेना महिला आघाडीने महिलांना एकत्रित करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले व त्यानंतर स्वच्छता अभियान राबवून मुख्यमंत्री साहेबांच्या स्वच्छतेच्या महाअभियानामध्ये सहभाग नोंदविला यांनतर उपस्थित सर्व महिलांनी कचरा न करण्याची व नियमित स्वच्छता पाळण्याची प्रतिज्ञा केली.माननिय मुख्यमंत्री साहेबांच्या या महाअभियानामुळे निश्चितच जनजागृती होऊन जनतेला स्वच्छतेचे महत्व कळण्यास मदत होईल. सदर कार्यक्रमामध्ये शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख सौ. सरिता बावस्कार, उपशहरप्रमुख सौ प्रज्ञा तांदळे, सौ. भावना सोनटक्के, विजया गोरे, भाग्यश्री तांदळे, जया इंगळे, सविता इंगळे, वाकूळकर ताई, दुर्गा मुऱ्हेकर, नेहा मंडवाले, प्राची मंडवाले, अंकिता काळे यासोबतच इतर असंख्य महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

أحدث أقدم