मलकापूर : मुले ही देशाची खरी संपत्ती आहे. भारताचे भविष्य आहे जगाचा अभिमान आहे आणि प्रत्येक पालकांचा अभिमान असतात.मुले- मुली ही देशाचे भावी नागरिक असून भविष्यात देशाच्या धर्म, संस्कृतीचे रक्षण व पोषण करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते.मातृशक्ती विदर्भ प्रांत समन्वयक फुलवंती दीदी यांच्या उपस्थितीत मलकापूर पारपेट येथील इति पुरात श्री राम मंदिरात विश्व हिंदू परिषद मातृशक्ती परिमाण तर्फे बाल संस्कार केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.बालसंस्कार वर्गाच्या उद्घाटन समारंभात प्रभू श्री राम व त्यांच्या दरबाराचे व भारत मातेचे पूजन कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या फुलवंतीताई कोरेड यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमाच्या अध्यक्षा मलकापूर तालुका मातृशक्ती संयोजिका नेहाताई सदावर्ते होत्या यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मातृशक्ती मलकापूर शहर संयोजिक व बालसंस्कार वर्ग प्रमुख अश्विनीताई काटे म्हणाल्या की,आजच्या काळात मुले आपल्या चालीरीती, परंपरा, धर्मशास्त्र विसरत चालली आहेत, एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत चालली असून, ते टिव्ही, सिनेमा पाहून परकीय संस्कृतीला आपला आदर्श मानत आहेत. आपल्या जेष्ठ यांचा आदर , दैनंदिन पूजा, मातृभाषेचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.नवीन पिढी मोबाईल,गेम्स, सोशल मीडियाच्या आहारी जात आहे ,मुले व्यसनाधीन होत आहेत, त्यामुळे आपल्या मुलांना लहानपणा पासूनच योग्य संस्कार मिळाले पाहिजेत जेणेकरून त्यांचे भविष्य घडेल ते तेजस्वी बनावी व पालक यांनी मुलांन कडून ज्या गोष्टी आपणास अपेक्षित आहे त्याचे आचरण आपल्या पासून करावे कारन ते आपल्याला पाहूनच अनुकरण करतात या करीता बाल संस्कार केंद्र सुरू करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या मातृशक्ती विदर्भ प्रांत सहसंयोजीक फुलवंतीताई यांनी यावेळी मुलांना व पालकांना संबोधित करताना सांगितले की आज प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपल्या मुलांनी केवळ शालेय अभ्यासातच यश मिळवावे असे नाही, तर खेळ, वक्तृत्व इत्यादी इतर कलांमध्ये आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्येही पुढे येऊन यशस्वी व्हावे.शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापक देखील त्यांच्या विद्यार्थ्यांनी हुशार असावेत आणि परीक्षेत चांगले काम करावे अशी अपेक्षा करतात.त्यांची बुद्धिमत्ता तीक्ष्ण व्हावी आणि परीक्षेत चांगले निकाल मिळावेत, जेणेकरून समाजात त्यांच्या संस्थेचा अभिमान वाढेल.पण दुर्दैव असे की आज पाश्चिमात्य संस्कृतीच्या आंधळ्या अनुकरणाच्या जमान्यात परदेशी टी.व्ही. चॅनेल्स, चित्रपट, व्यसने, अशुद्ध खाण्याच्या सवयी इत्यादींमुळे वातावरण इतके प्रदूषित झाले आहे की, आपल्या मुलांना जीवनात चांगले संस्कार घडवायचे असले तर ज्या मार्गावर ते अनुसरून सुसंस्कारित मुलं बनतील, असा कोणताही मार्ग त्यांना दिसत नाही.मुलांना जोमदार, तेजस्वी आणि यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद भारतीय संस्कृतीच्या अनमोल सेवा देत आहे.या चांगल्या प्रवृत्तींमध्ये बालसंस्कार केंद्रे मुख्य भूमिका बजावत आहेत.बालसंस्कार केंद्रे पालक आणि शिक्षकांचा आदर आणि आज्ञापालन, प्राणायाम, योगासन, सूर्यनमस्कार, ध्यानधारणा, स्मरणशक्ती वाढवण्याच्या टिप्स, लहान मुलांच्या कथा, सण-उत्सव यांसारखी उच्च मूल्ये बजावत आहेत. , देशभक्त आणि संतांचा गौरव.महापुरुषांची दैवी चरित्रे, श्रीमद्भगवद्गीतेतील श्लोक, संतांनी सांगितलेल्या कथा, विविध स्पर्धा, खेळ, वार्षिक उत्सव इत्यादींचे कथन करून विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्ती जागृत होतात आणि त्यांच्यातील सुप्त शक्ती जागृत होतात. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास प्रदान केला जाते.भाऊसाहेब मरेकर सरांच्या श्री राम मंदिरात आणि अश्विनीताई काटे यांच्या चाळीस बिघा येथिल घरामध्ये दैनंदिन बालसंस्कार वर्ग सुरू झाला आहे.या बालसंस्कार उदघाटन सोहळ्यात ३० मुले-मुली व त्यांचे पालक व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.मातृशक्ती सत्संग प्रमुख भारती वैष्णव यांनी उपस्थित मान्यवर पालकवर्ग विहिप पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.
बालपणातील संस्कार आणि चारित्र्य घडवणे हा माणसाच्या भावी आयुष्याचा पाया असतो - फुलवतीताई कोरडे
Hanuman Sena News
0
إرسال تعليق