Hanuman Sena News

ऑटोतून नेण्यास नकार, चालकास मारहाण;चावी मारून केले जखमी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल...




खामगाव: ऑटो पंचर झाल्यामुळे ऑटोतून नेण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या दोघांनी ऑटो चालकास मारहाण केली. ही घटना गुरूवारी दुपारी जुन्या बसस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी ऑटो चालकाच्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अक्षय गजानन माने रा. बर्डे प्लॉट या ऑटोचालकाने शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार, गुरूवारी दुपारी जुन्या बसस्थानकाजवळ त्याचा ऑटो पंचर झाला. त्यामुळे बंटी कवटेकर आणि आकाश कवटेकर रा. हरिपॐैल, खामगाव या दोघांना ऑटोत बसण्यास नकार दिला. या गोष्टीचा राग अनावर झाल्याने दोघांनी शिविगाळ करून हनुवटीवर चाबी मारून जखमी केल्याचा अाराेप तक्रारीत केला. पोलीस तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून शहर पोलीसांनी उपरोक्त दोघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم