खामगाव: जिल्ह्यातील १३ ही तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, ५९ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक ५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. दरम्यान, पुढील वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुका होत असल्याने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले असून, एकप्रकारे दिवाळी आधीच जिल्ह्यातील सातही आमदारांची या निवडणुकीच्या अनुषंगाने परीक्षा होणार आहे. परिणामी जिल्ह्यातील आमदारांनी या निवडणुकीमध्ये लक्ष घातले आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक त्यातच आगामी काळ हा मोठ्या निवडणुकांचा असल्याने या निवडणुकांसाठी एक प्रकारे लिटमस पेपर टेस्ट प्रमाणे आगामी काळ हा मोठ्या निवडणुकांचा आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील सातही आमदारांनी या निवडणुकांमध्ये लक्ष घातले असून, भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे, अॅड. आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले, शिवसेना शिंदे गट आमदार डॉ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड यांनी नियोजन केले आहे. महाविकास एक आघाडीकडून काँग्रेसचे आमदार राजेश एकडे, अमरावती पदवीधर विधानसभा आहे. मतदारसंघाचे आमदार धिरज लिगाडे यांच्यासह महाविकास आघाडीच्या अन्य पदाधिकायांनी ग्रामपंचायत निवडणुकीच आपापले झेंडे कसे फडकतील यावर लक्ष केंद्रित केले आहे.लोकप्रतिनिधींसाठी ही भविष्यातील चाचपणी जिल्ह्यातील सातही आमदारांनी त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीकडे गांभीर्याने पाहणे सुरू केले आहे. त्यातही महायुती विरुद्ध महाआघाडी अशी लढत ग्रामपंचायत निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला जिल्ह्यात मलकापूर येथील आमदार राजेश एकडे यांच्या रूपाने लोकप्रतिनिधी आहे, तर महायुतीकडे भाजपचे तीन शिवसेना शिंदे गटाचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आमदार अशी सहा आमदारांची फळी आहे.८३ जागांसाठी पोटनिवडणूक विजयादशमीनंतर होणार चित्र स्पष्ट ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबतच ५९ ग्रामपंचायतींमध्येही पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये सरपंचासह सदस्यांच्या मिळून ८३ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दि. २० ऑक्टोबर शेगाव नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.दि. २५ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर ५ नोव्हेंबरला मतदान मलकापूर होईल, तर ६ नोव्हेंबरला निकाल स्पष्ट होतील. विजयादशमीनंतर १२ दिवसांनी हा निकाल लागणार आहे.
४८ ग्रामपंचायतींची निवडणूक : नामांकन अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस
Hanuman Sena News
0
إرسال تعليق