Hanuman Sena News

वेद व्यासपीठाच्या वतीने औषधी वनस्पती अध्ययन व पथ भ्रमंती मोहिमेचे आयोजन


नितीन भुजबळ.
विशेष प्रतिनिधी,

मलकापूर दि.१८ ऑक्टोबर आयुर्वेद शास्त्रानुसार वन्यपरिक्षेत्रामध्ये अनेक औषधी वनस्पती आढळून येतात. परंतु याबाबत फारशी माहिती नसल्याने अशा दुर्मिळ वनस्पतींची माहिती व औषधी गुणधर्म यांचा  उपयोगात येत नाहीत. त्याच अनुषंगाने बोथा वनपरिक्षेत्र बुलढाणा अंतर्गत येणाऱ्या ज्ञानगंगा अभयारण्याततील औषधी वनस्पतीचा शोध व अभ्यास करण्याच्या उद्देशाने दि २२ ऑक्टोबर रविवार रोजी आयुर्वेद व्यासपीठ, बुलढाणा यांच्या वतीने औषधी वनस्पती अभ्यास तथा वन पथ भ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर अभ्यास दौऱ्यासाठी मुख्य मार्गदर्श म्हणून  सेवा निवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी  डॉ. गिरी यांच्या सह आयुर्वेद क्षेत्रातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारक व विद्यार्थी आदींचा सहभाग राहणार आहे. त्या अणुशंगाने आयुर्वेद शास्त्रात सेवा देणारे डॉक्टर, वैद्य, विद्यार्थ्यी तथा पर्यावरण प्रेमी यांनी अभयारण्य क्षेत्रातील आयुर्वेदीक वनस्पतीची ओळख व महत्व जाणून घेण्यासाठी या एक दिवसीय दौरा करण्यासाठी युवकांनी सहभाग घेण्याचे आवाहन वेद व्यासपीठाचे अध्यक्ष वैद्य अमित चौधरी यांनी केले आहे. माहितीसाठी  शाखेच्या मेल आयडी vyaspeethbuldhana@gmail.com कींवा मलकापर येथील वेदांश आयुर्वेद च्या कार्यालयामध्ये 8983322341 या क्रमांकावर संपर्क साधावा साधन्याचे आवाहन वेद व्यासपीठाच्या वितीने करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم