Hanuman Sena News

दसरा, दिवाळीसाठी मलकापूर, शेगावमार्गे ३० विशेष रेल्वे गाड्या...

१९ ऑक्टोबरपासून मुंबई-नागपूर व पुणे-नागपूरदरम्यान होणार फेऱ्या


 खामगाव : आगामी दसरा, दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर व पुणे- नागपूर दरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १९ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर कालावधीत एकूण ३० फेऱ्या होणार असून, संपूर्णपणे तृतीय श्रेणी वातानुकूलित डबे असलेल्या या गाड्यांना मलकापूर, शेगाव स्थानकात थांबा असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्रमांक ०२१३९ सीएसएमटी- नागपूर द्विसाप्ताहिक सुपरफास्ट विशेष एक्स्प्रेस १९ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत दर गुरुवारी व सोमवारी मुंबई येथून रात्री ००:२० वाजता रवाना होऊन त्याच दिवशी दुपारी १५:३० वाजता नागपूर स्थानकात पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ०२१४० नागपूर-सीएसएमटी सुपरफास्ट विशेष एक्स्प्रेस २१ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत दर शनिवारी व मंगळवारी १३:३० वाजता नागपूर स्थानकातून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ०४:१० वाजता सीएसएमटी स्थानकात पोहोचेल. या गाडीच्या एकूण २० फेऱ्या होणार आहेत.नागपूर-पुणे साप्ताहिक विशेषच्या दहा फेऱ्या नागपूर ते पुणे या मार्गावरही साप्ताहिक विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या दहा फेऱ्या होणार आहेत. ०२१४४ नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १९ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत दर गुरुवारी नागपूर स्थानकातून सायंकाळी १९:४० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी पुणे स्थानकात ११:२५ वाजता पोहोचणार आहे.परतीच्या प्रवासात २२१४३ पुणे-नागपूर सुपरफास्ट विशेष २० ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी पुणे स्थानकावरून दुपारी १६:१० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ०६:३० वाजता नागपूर स्थानकात पोहोचणार आहे.संपूर्ण वातानुकूलित रेल्वे साप्ताहिक व द्विसाप्ताहिक विशेष असलेल्या या दोन्ही गाड्या संपूर्णपणे वातानुकूलित असणार आहेत. ॥ या गाड्यांना १६ तृतीय श्रेणी वातानुकूलित (इकॉनॉमी) डबे असणार आहेत.मुंबई-नागपूर गाडीला भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेर तर नागपूर-पुणे गाडीला मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा या स्थानकांत थांबा आहे.

Post a Comment

أحدث أقدم