बुलडाणा :- महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात दिव्यांगांच्या दारी अभियान राबविणेअंतर्गत मा. जिल्हाधिकारी साहेब, बुलडाणा यांचे आदेशान्वये दि ०६.१०.२०२३ शुक्रवार रोजी बुलडाणा येथे सहकार विद्या मंदिर, सांस्कृतिक सभागृह, चिखली रोड येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्या दिव्यांगांकडे दिव्यांग प्रमाणपत्र नाहीत अशा दिव्यांगांची सामान्य रूग्णालयाच्या डॉक्टर मंडळी कडून तपासणी होवून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार असून जिल्हा दिव्यांग पूनर्वसन केंद्र बुलडाणा यांच्या एडीप योजनेअंतर्गत सहायक साहित्य वितरीत करणेसाठी नोंदणी करण्यात येणार आहे. सर्व प्रवर्गाचे दिव्यांगांना शासनाच्या तहसील स्तरावरील विविध योजनांचा दिव्यांगांना लाभ व्हावा याकरीता विशेष नोंदणी पथक कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणार आहेत. याव्यतिरिक्त दिव्यांगांना लाभदायक अशा अनेक योजनांची माहिती देण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे उदघाटक मा.ना. श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, अध्यक्ष, दिव्यांग कल्याण विभाग हे असून कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ना. श्री गुलाबराव पाटील, मंत्री पाणी पुरवठा व स्वच्छता म.राज्य तथा पालकमंत्री बुलडाणा हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मा.खा. श्री. प्रतापरावजी जाधव, मा. खा. श्रीमती रक्षाताई खडसे, खंडेलवाल यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.तसेच मा.आ. श्री. किरण सरनाईक, मा.आ.श्री. वसंत सरनाईक, मा.आ.श्री. धिरज लिंगाडे, मा.आ. श्री. डॉ. राजेंद्र शिंगणे, मा. आ. श्री. डॉ. संजय कुटे, मा.आ.श्री. संजय रायमुलकर, मा.आ.श्री.आकाश फुंडकर, मा. आ.श्री.संजय गायकवाड, मा.आ.सौ. श्वेताताई महाले, मा. आ. श्री. राजेश एकडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित म्हणून महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी मा. श्री. अभय महाजन, सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, महा. राज्य, मा. श्री. विष्णूदास घोडके, आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पूणे मा. श्री. डॉ. निधी पाण्डेय, विभागीय आयुक्त, अमरावती, मा. श्री. डॉ. किरण पाटील, जिल्हाधिकारी बुलडाणा मा. श्रीमती भाग्यश्री विसपुते, सी ई ओ, जि.प. बुलडाणा मा. श्री. सुनिल कडासने, एस. पी. बुलडाणा, मा. श्री. सुनिल वारे, प्रादेशीक उपायुक्त समाजकल्याण, अमरावती. इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.या कार्यक्रमस्थळी दिव्यांगांकरीता अल्पोपहार तसेच भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली असून जिल्हयातील सर्व प्रवर्गातील दिव्यांगांनी हजर राहण्याचे आवाहन डॉ. अनिता राठोड, सहा. आयुक्त, समाजकल्याण, बुलडाणा, मा. श्री. मनोज मेरत, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जि. प. बुलडाणा व मा. श्री. गणेश पांडे, प्रशासन अधिकारी, न. पा. बुलडाणा यांनी केले आहे.
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान
Hanuman Sena News
0
إرسال تعليق