Hanuman Sena News

देशी कट्यासह दोन जिवंत काडतुसे जप्त; देऊळगाव मही येथिल तरुणास अटक...












 देऊळगावराजा : देशी कट्यासह दाेन जिवंत काडतुसे घेऊन फिरत असलेल्या युवकास देऊळगावराजा पाेलिसांनी ३० सप्टेंबरला रात्री अटक केली. त्याच्याकडून देशी कट्टा व काडतूस जप्त करण्यात आले आहे़.देऊळगाव मही येथे पेट्रोल पंपावर एका तरुणाकडे देशी कट्टा व जिवंत काडतूस असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली़ या माहितीच्या आधारे पाेलिसांनी पथक तयार घटनास्थळावर भेट दिली़ तेथे संशयास्पदरीत्या आढळलेल्या युवकास ताब्यात घेऊन त्याची चाैकशी केली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला़ मात्र, सावध असलेल्या पाेलिस पथकाने त्याला अटक केली़ त्याची झडती घेतली असता गावठी कट्टा व दाेन जिवंत काडतुसे आढळली. त्याला नाव विचारले असता त्याने विशाल ऊर्फ कैलास नारायण दिघे वय २३ वर्षे रा. देऊळगाव मही असे नाव सांगितले़ त्यास देशी कट्टा वापरण्याचा परवाना विचारला असता त्याने त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले़ त्याच्याविरुद्ध पाेलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़ ही कारवाई पाेलिस अधीक्षक सुनील कडासणे, अपर पाेलिस अधीक्षक बी़ बी़ महामुनी, उपविभागीय पाेलिस अधिकारी अजयकुमार मालवीय यांच्या मार्गदर्शनात पाेलिस निरीक्षक संताेष महल्ले, सहायक पाेलिस निरीक्षक हेमंत शिंदे, हेकाॅ कलीम देशमुख, विश्वनाथ काकड, सय्यद मुसा, पाेलिस नाईक गणेश जायभाये, पाेकाॅ नीलेश माेरे यांनी केली़

Post a Comment

أحدث أقدم