Hanuman Sena News

मलकापूर येथे मोफत कृत्रिम पाय व हात प्रत्यारोपण शिबिर...





मलकापूर:  सेठ बी.जे. संचेती लोकसेवा ट्रस्ट मलकापूर व साधू वासवानी मिशन, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने कृत्रिम हातपाय शिबिर दिनांक 20/8 /2023 ला मलकापूर येथे महावीर भवनात घेण्यात आले होते. त्या शिबिरात या दिवशी दिव्यांगाचे हातपाय मोजणी करण्यात आली.हातपाय मोजणी झालेल्या 102 दिव्यांगांचे कृत्रिम हातपाय बनवून तयार आहेत. त्याचे वाटप दिनांक 24/ 9/ 2023 रविवार रोजी महावीर भवन मलकापूर येथे घेण्यात येणार आहे. कृत्रिम अवयाची मोजमाप केलेल्या दिव्यांगांनी दिनांक 24 /9/ 2023 रविवारला सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हजर राहावे तेथे त्यांना कृत्रिम हात पाय प्रत्यारोपणाचा कार्यक्रम होईल. तरी सर्व नोंदणी झालेल्या दिव्यांग बंधू-भगिनींनी 24 /9/ 2023 रोजी सकाळी 9 वाजता महावीर भवन मलकापूर येथे उपस्थित रहावे. व कृत्रिम हातपाय बसून घ्यावे. असे निवेदन सेठ बि.जे. संचेती लोकसेवा ट्रस्ट मलकापूर व प्रहार जनशक्ती संघटना मलकापूर ,दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर, अपंग जनता दल सामाजिक संघटना मलकापूर, हनुमान सेना मलकापूर ,मूकबधिर मतिमंद विद्यालय मलकापूर यांनी असे आवाहन केले आहे. सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील व जिल्हास्तरावरील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व दिव्यांगांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे बी.जे.संचेती लोकसेवा ट्रस्ट यांनी सांगितले आहे.

Post a Comment

أحدث أقدم