मलकापूर: भाजपा महिला दलित आघाडीच्या सौ प्रमिलाताई इंगळे व भाजपा पदाधिकारी यांनी तहसीलदार साहेब यांना निवेदनाद्वारे सांगितले की दि. 1/ 9/ 2023 रोजी मलकापूर भाग 1 चे तलाठी यांचे कार्यालयांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यास त्यांनी विरोध दर्शविला.या विषयावरून त्यांनी प्रमिलाताई इंगळे यांच्याशी हुज्जत घातली. याबद्दल सोशल मीडिया वृत्तांमध्ये 1/9/ 2023 रोजी बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्यामुळे काही अनुसूचित प्रकार भविष्यात घडल्यास त्यास मी( प्रमिलाताई इंगळे) जबाबदार राहणार नाही असे निवेदनात म्हटले आहे. तसेच प्रत्येक कार्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्यात यावे.अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे प्रमिलाताई इंगळे यांनी निवेदनाद्वारे सांगितले यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते सुरेश भाऊ संचेती,विजय डागा,अरविंद किनगे, दलित महिला आघाडीच्या प्रमिलाताई इंगळे,भाजपायुमो जि.उपाध्यक्ष नानाभाऊ येशी भाजपा सचिव विशाल मधवाणी, संतोष घाटे, दुर्गेश राजापुरे, रवी वानखेडे, साहेबराव खराडे, कुणाल ढोलकर, देवीन टाक, सौ.विद्या तायडे, सौ.वेळुबाई इंगळे, प्रशांत पाटील,ज्ञानदेव चोपडे, गणेश बगाडे, अमोल चोपडे, भीमराव बिराडे, विजय मोरे,आर एन वानखेडे ई.पदाधिकारी उपस्थित होते.
तलाठी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावा अन्यथा आंदोलन करू- प्रमिलाताई इंगळे...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق