Hanuman Sena News

स्नेहिजनांनी साजरा केला भाजपा नेते मोहन शर्मा यांचा जन्मदिवस...


मलकापूर  :  भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून पक्षबांधणीचे काम करत असणारे मोहनजी शर्मा यांचा वाढदिवस दि.०१ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीत वाढलेल्या मोहनजी शर्मा यांचा जन्मदिवस कुठलाही गाजावाजा न करता अगदी साधेपणाने संपन्न झालेल्या या सोहळ्या दरम्यान अनेक सामाजिक,आध्यात्मिक तथा सर्वपक्षीय राजकीय नेते,तथा विविध क्षेत्रातील दिग्गजांनी भरभरून शुभेच्छा देत त्यांचे अभिष्टचिंतन केले.सकाळी 9 वाजता गाडेगाव संस्थान मलकापूर येथील मंदिरात महादेवाच्या पिंडीवर दूध अभिषेक करण्यात आला व 9:30 वाजता मतिमंद हायस्कूल मलकापूर येथे विद्यार्थ्यांना जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता तसेच त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांचा चाहता वर्ग अभिष्टचिंतन करण्यासाठी मोठ्या गर्दीने शुभेच्छा देण्यासाठी आला ."म्हणतात ना जे पेरलं ते उगवते" काल त्याची प्रचिती पहायला मिळाली एखाद्या नेत्याला लाजवेल एवढा प्रचंड जनसमुदाय वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एकवटला होता.त्यांच्या राजकीय जीवनात त्यांनी भारतीय जनता पक्षाला आपले एक संपूर्ण जीवन समर्पित केले पक्ष वाढीसाठी त्यांनी प्रचंड मेहनत करून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रत्येक घरापर्यंत बनवण्याच काम त्यांनी मलकापूर तालुक्यात केले तसेच त्यांचे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा दांडगा परिचय असून त्यांचा चाहता वर्ग आहे. स्वतःच्या बळावर संघटन कार्यकर्त्यांची फळी जिल्हाभर निर्माण केली टिकवली आहे नशिबाने हुलकावणी दिल्याने सध्या त्यांना सक्रिय राजकारणात पद स्पेस नसला तरी भविष्यातील राजकारण मोहनजी शर्मा यांच्या भोवतीच फिरणार यात शंका नाही सर्व सामान्य लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या लोकप्रिय नेत्याला भावी वाटचालीस शुभेच्छा.

Post a Comment

أحدث أقدم