Hanuman Sena News

मलकापुरात लंपी आजारावरती इलेक्ट्रो होमिओपॅथी औषध तयार ; आरडी हेल्प फौंडेशन मदतीस सज्ज


मलकापूर: डॉ गणेश पाटील भक्ती क्लिनिक मलकापूर यांनी लंपी आजारांवर इलेक्ट्रो होमिओपॅथी औषध तयार केले आहे मागील दोन वर्षापासून संपूर्ण भारतामध्ये या आजाराचे मोठ्या प्रमाणात गायी व बैल मृत्युमुखी पडले आहेत अशा या भयंकर आजा वरती मलकापूर येथील डॉक्टर गणेश पाटील यांनी औषध तयार केलेले आहे यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 600 गोरक्षनाला हे औषध मोफत देण्याचं निर्णय घेतला आहे. व आपल्या सर्वसामान्य शेतकरी बंधूंसाठी फक्त पन्नास रुपयांमध्ये त्यांनी औषध उपलब्ध करून दिलेली आहे. तर यावेळी आरडी हेल्प फाउंडेशनचे रितेश भाऊ दहिभाते यांनी त्यांची भेट घेतली व त्या विषयावर चर्चा केली असता. आश्वासन दिले की गोरक्षण कामासाठी व धर्म कार्यासाठी आम्ही तुमच्यासोबत सेवा  देण्यासाठी तत्पर आहोत  यावेळी उपस्थित आनंद कुमार शर्मा, अंकित बोंबटकर, अंकित धोरण, कुणाल दंडे, अभिषेक धोरण, बंटी धोरण ई. आर डी हेल्प फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

Post a Comment

أحدث أقدم