मलकापूर: मागील कोरोना काळापासून बंद करण्यात आलेली गोरगरीबांची सर्वसामान्यांची सर्व स्थानकांवर थांबणारी ५१२८५-५१२८६ भुसावल नागपूर पंसेजर गाड़ी लवकरात लवकर पुन्हा सुरु क२ण्यात यावी तसेच मलकापूर रेलवे स्थानकाचा अमृत भारत योजनेचा माध्यमातून जे विकास कार्य होणार आहे त्यात मलकापूर रेलवे स्थानकावर स्वचलित जीना प्रस्तावित केला गेला होता परंतु अंतिम कार्य यादीत रेलवे बोर्डा तर्फे याला मंजूरी मिळाली नसल्यामुळे या संबंधी येणाऱ्या तांतिक अडचणी विषयी विद्युत विभाग, इंजीनियरिंग विभाग, तांत्रिक विभागातील सर्व अधिकाऱ्याशी चर्चा करून लवकरात लवकर स्वचलितजिन्याची मंजुरात घेऊन है कार्य समाविष्ट करण्यात यावे यासबंधी जनरल मॅनेजर मध्य रेल मुंबई यांचाशी प्रत्यक्ष भेटून जिल्हा प्रवासी संघाचे अध्यक्ष अँड महेंद्र बुरड व सचिव रुपेश श्रीश्रीमाळ यांनी निवेदन देऊन चर्चा केली.तसेच सदर निवेदन मा. रेलवे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे यांचा चर्चगेट येथील कार्यालयात देखील प्रत्यक्ष देऊन तेथील अधिकार्यांशी देखील या विषया वर चर्चा केली.
भुसावल नागपूर पॅसेंजर पुन्हा सुरु करण्यासाठी प्रवासी संघातर्के निवेदन...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق