Hanuman Sena News

सुनेच्या आई-वडिलांच्या व नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याने घेतली फाशी; चिट्ठी लिहून संपवली आपली जीवन यात्रा...




मलकापूर : सुनेच्या आई-वडिलांच्या व नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आठ जनाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत एकही आरोपीला अटक करण्यात आली नाही.या प्रकरणी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की फिर्यादी कल्पेश सोनोने यांचे लग्न नंतर 15 दिवसांनी त्यांची पत्नी आरती सोनोने ही छोटया कारणावरुन नवऱ्यासोबत वाद घालत होती व गळफास घेण्याची धमकी देत होती. व मला तुमच्या सोबत राहायचे नाही. मला माझ्या घरी सोडा वरुन ती तिचे माहेरी गेली व फिर्यादीस मला फारकती पाहीजे व फारकती मध्ये लग्नाला आलेला खर्च पाच लाख व माझे सोन्याचे दागिने, लग्नात मिळालेले भांडे पाहीजे नाहीतर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला एखादया खोट्या केस मध्ये फसवुन टाकीन अशी धमकी दिली व या प्रकरणातील आरोपी क्र 1 ते 8 यांनी संगनमत करुन फिर्यादी व त्याचे वडीलांना फोनवर व प्रत्याक्ष भेटुन पाच लाख रुपये व सोन्याचे दागीने, भांडे दया नाहीतर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करेल. फोन करुन व प्रत्यक्ष भेटुन धमकी देऊन शिवीगाळ केली व फिर्यादी यांच्या वडीलास नाहक मानसिक त्रास देवुन त्यांना आत्महत्यास प्रवृत्त केल्याने फिर्यादी यांचे वडीलाने वर नमुद 1ते 8 आरोपी यांचे त्रासाला कंटाळुन त्यांचे राहत्या घरात गळफास घेतला आहे.याप्रकरणी दिलेल्या कल्पेश मधुकर सोनोने वय 23 वर्ष रा. मलकापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पत्नी आरती कल्पेश सोनोने वय 22 वर्ष रा. ह. मु. पातोंडा ता. नांदुरा, रघुनाथ निनाजी झाल्टे वय 55 वर्ष, अनिता रघुनाथ झाल्टे वय 46 वर्ष, वैभव रघुनाथ झाल्टे वय 25 वर्ष तिन्ही रा. पार्तोडा ता. नांदुरा, शुभागी प्रविण बावस्कार वय 32 वर्ष रा. लोणवडी ता. मलकापुर, विजय माणिकराव बाम्हंदे वय 45 वर्ष, कृषवर्ता विजय बाम्हदे दोन्ही रा. औरंगाबाद, काशीनाथ न्हावकर वय 50 वर्ष रा. हनुमान टाकीजमागे मलकापुर यांच्या विरुद्ध कलम 306, 504, 506 34 भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم