Hanuman Sena News

विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी यांच्या तर्फे मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन साजरा...




मलकापूर:  रक्षाबंधन निमित्य विश्व हिन्दू परिषद दुर्गा वाहिनी मलकापुर तर्फ़े पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच SRPF च्या बांधवाना राखी बांधण्या साठी पोलीस स्टेशन मलकापूर येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.पोलीस बांधवांमुळे समाजात महिलावर्ग सुरक्षित आहे राखी हे बहीण भावाच्या विश्वासाचे प्रेमाचे रक्षणाचे प्रतीक आहे भावाने बहिणीला दिलेला विश्वास म्हणजे रक्षाबंधन त्याचाच एक भाग व कर्तव्य म्हणून पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला पोलीस कर्मचारी दिवस-रात्र आपल्या सगळ्यांची सेवा करतात सणासुदीच्या दिवशी सुद्धा त्यांना आपली ड्युटी करावी लागते. त्यासाठी आम्ही हा रक्षाबंधन सण पोलीस स्टेशन मध्ये साजरा केला.पोलीस भावांच्या हाताला राखी बांधल्यानंतर त्यांच्या मनात आनंद दिसून आला व त्यांच्या चेहऱ्यावरील ते हास्य तेज बघून खरोखरच सर्व दुर्गा वाहिनी व विश्व हिंदू परिषद माता भगिनींचे मन प्रसन्न झाले.पोलीस कर्मचारी यांनी दुर्गावनीच्या व विश्व हिंदू परिषद च्या बहिनींचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषद व दुर्गा वाहिनीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم