साकोली: तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने 9 वर्षीय मुलीशी अश्लील चाळे केले यात मुलीच्या आजीने केलेल्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी पोक्सो अंतर्गत शिक्षकाला अटक केली आहे. देवराम लक्ष्मण पटले (56) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.शाळेत खेळ शिकवत असताना मुलीला वाईट उद्देशाने हात लावल्याने मुलगी ओरडली मुलीने घरी जाऊन आजीला शाळेत घडलेली घटना सांगितली एक महिन्यापूर्वी याच शिक्षकाने मुलीशी ऑफिसमध्ये कार्यालयात एकटीलाच बोलून अत्यंत घाणेरड्या रीतीने अश्लील चाळे केले होते. पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने मुलीच्या आजीने साकोली पोलीस ठाण्यात 5 ऑगस्टला घटनेची तक्रार दिली शिक्षक देवराम लक्ष्मण पटले या शिक्षकावर कलम 376 (2) जे,एफ सहकलम 4,6,8,10 व पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय खोकले करीत.
निवृत्तीला आलेल्या शिक्षकाचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; झाली अटक
Hanuman Sena News
0
إرسال تعليق