विशेष प्रतिनिधी,
अमोल पाटील
मलकापूर: तांदुळवाडी व तालसवाडा येथील विद्यार्थी मलकापूर येथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात पण विद्यार्थ्यांसाठी बस नियमित वेळेवर येत नसल्यामुळे शाळेत विद्यार्थी वेळेवर पोहोचण्यास वेळ लागतो व काही वेळेस बस थांबतही नाही त्यामुळे शाळेत येण्यास उशीर होतो व उशीर झाल्यामुळे एक दोन तासिकांचा अभ्यास अपूर्ण राहतो हा होणारा त्रास विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील यांना भ्रमणध्वनी द्वारे सांगितले. संपूर्ण माहिती लक्षात घेता अमोल पाटील यांनी भाजपा ज्येष्ठ नेते मोहनजी शर्मा यांना सांगितले व संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन व्यवस्थापक साहेब यांच्या लक्षात आणून दिला व बस नियमित थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांवर जो त्रास होत आहे त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आगार व्यवस्थापक साहेब यांनी बस नियमित वेळेवर येईल व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आगार व्यवस्थापन कायम कटिबद्ध राहील आमच्याकडून विद्यार्थ्यांना कोणतीही अवहेलना होणार नाही असे आश्वासन दिले.यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते मोहनजी शर्मा, अरविंद किनगे,अमोल टप,सागर बेलोकार,अमोल पाटील व असंख्य विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते
إرسال تعليق