Hanuman Sena News

भर दिवसा गुरे चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी केले जेरबंद...


मलकापूर : मलकापूर शहरात गुरांच्या चोरीचे प्रकार दिवसेन दिवस वाढत असून मलकापूर शहरात आजपर्यंत मोकाट व गोठ्या मधुन मध्य रात्री गुरे चोरीला जाण्याची घटना मोठ्या प्रमाणावर घडत होत्या. शुक्रवार दि. 25/8/2023 रोजी भर दुपारी 1वाजेच्या सुमारास चोरीची घटना मलकापूर शरात घडली आहे याने पोलिस प्रशासन यांचे गुरे चोरांवर दडपण बाबत नागरिकांच्या मानत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. मलकापूर येथील जुने गाव भागामधील विक्रमसिंह ठाकूर यांच्या मालकीची गाय सुमारे एक वाजेच्या सुमारास गाय चोरून नेणाऱ्या चोराला रंगेहात पकडले त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी त्या चोरट्याला चांगलाच चोप दिला. स्थानिक सामजिक कार्यकर्ते संदीप पाटील, कुशल ठाकूर, निलेश सपकाळ, मंथन ठाकूर यांनी चोरट्याला मलकापूर शहरातील पोलीस स्टेशनला धरून आणले चोरट्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम 379 नुसार गाय मालक विक्रमसिंह ठाकुर यांनी शहर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मलकापूर पोलीस स्टेशन करीत आहे. सदर इसमाची सखोल चौकशी केली असता तो मलकापूर शहरा नजीक असलेल्या जांभूळ धाबा परिसरातील आहे असे त्यांनी सांगितले. विजय दगडू अंभोरे वय वर्ष 22.मागिल काही वर्षा पासून शहरात वाहन चोरी, गुरे चोरी, बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेन दिवस वाढत आहे. तरी नगर पालिका प्रशासन यांनी नागरिकाच्या सुरक्षितते साठी व मुक्या जनावरांच्या रक्षणा करीता शहरी भागात CCTV कॅमेरे बसवल्यास असे कृत्य करणाऱ्या गुन्हेगार यांना पकडण्यास पोलिस प्रशासन यांना मदत होईल व नागरिकांचे हीत जोपासल्या जाईल. तसेच सर्व गोवंश पालक यांनी जागरूक राहून अश्या चोरांना पोलिस प्रशासन यांच्या स्वाधीन करुन पोलिस प्रशासन यांना मदत करावी असे दिपक कोलते, बजरंगदल मलकापूर नगर संयोजक यांनी आवाहन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم