मलकापूर: तालुका विधी सेवा समिती व वकील संघ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने 23 ऑगस्ट रोजी तहसील चौक मलकापूर येथे "रस्ता वाहतूक नियम " शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिर तालुका विधी सेवा समितीचे सचिव पी.आर.कदम यांच्या मार्गदर्शनात पार पडले. यावेळी राज्यातील वाहनधारकांना रस्ता वाहतुकीचे नियमान बाबत अॅड योगेश पाटील यांनी मार्गदर्शन करून वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. या शिबिरासाठी बहुसंख्येने वाहनधारक उपस्थित होते. या शिबिराप्रसंगी मार्गदर्शन करण्यासाठी अॅड योगेश पाटील, अॅड जयंत तायडे , अॅड दिलीप बगाडे, अॅड रुपेश जगताप, अॅड एम. एम. काजी,अॅड मराठे, अॅड विवेक महाजन, जयंत पाटील उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते दिलीप गोळीवाले आणि मलकापूर शहर पो. स्टे.चे ठाणेदार अशोक रत्नपारखी, गजानन कुलकर्णी,वाहतूक पोलीस तायडे तसेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी मलकापूर न्यायालयाचे अशोक ठोसे व केणेकर यांनी सहकार्य केले.
मलकापूर वकील संघातर्फे रस्ता वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق