मलकापूर: छ. शिवाजी नगर मलकापूर मधील साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे भवन येथे 1ऑगस्ट रोजी साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीचे अयोजन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्रल्हाद महाराज बांगरतर प्रमूख वक्ता म्हणुन ह.भ. प संजय महाराज घोडके विहिप सत्सग प्रमुख तसेच बजरंगदलाचे मोहनसिंह राजपूत होते तर दिपक चवरे जिल्हा समरसता सहप्रमूख यांची विशेष उपस्थिति लाभली.कार्यक्रमाची शुरुवात भारत माता , आण्णा भाऊ साठे तसेच लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन माल्या अर्पण व दीप प्रज्वलन करुन झाले.उपरांत या कार्यक्रमास लाभलेले वक्ता मोहनसिंह राजपूत यांनी उपस्थित माता बघिनी यांना आण्णाजी यांच्या जीवना बाबत सांगितले की आपले विचार, कार्य व प्रतिमा यातून लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 01 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते.गरिबी व भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. ते वडिलांबरोबर मुंबईत आले. तिथे त्यांनी मिळेल ते काम केले. जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. पण ते खचले नाहीत. नैराश्य हे तलवारीव र साठलेल्या धुळीसारखे असते. धूळ झटकली की तलवार पुन्हा धारदार बनते. अशी त्यांची विचारसरणी होती.तसेच घोडके महाराज यांनी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त उपस्थित स्रोता गण यांना लोकमान्य टिळक यांच्या विषय आपले विचार प्रगट केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ओम शिंदे यांनी केले जयंती उत्सव मध्ये मोठ्या संख्येत समाज बंधू उपस्थित होते .कृष्णा मानिक राव तायडे, गणेश भाऊ शिवसागर रविंद्र काशीराम डांडगे हे या कार्यक्रमास विशेष उपस्थित होते. कार्यक्रम नियोजन करीता विश्व हिंदु परीषद, बजरंगदल,यांचे कार्यकर्ता यांनी परिश्रम घेतले.
साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती विश्व हिंदु परीषद समरसता विभाग द्वारा साजरी...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق